पुणे जिल्हा | जालिंदर कामठे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल
Updated On:

सासवड, (प्रतिनिधी) – पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कामठे यांनी हवेली भागातून तयारी करत असतानाच कोंढवा ते सासवड रॅली काढत सासवड येथील हिवरे रस्त्यावरील कार्यालया पासून सासवड नगरपरिषदेच्या शिवतीर्थ चौकापर्यंत वाजत गाजत पदयात्रा काढली.
तर जालिंदर कामठे यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष पांडुरंग देवकर, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भानुदास जगताप, कुंभारवळणचे माजी सरपंच सचिन पठारे आदी उपस्थित होते.




