पुणे जिल्हा | प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल
Updated On:

सासवड, (प्रतिनिधी) – पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून काम करणारे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सकाळी वाल्हे येथील ग्रामदैवत श्री नाथ म्हस्कोबा व महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले व पुष्पहार अर्पण करून वाल्हे ते सासवड रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला व यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या कार्यालयामध्ये कार्यकर्ता संवाद सभा घेण्यात आली.
प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष वंदना चव्हाण, उपाध्यक्ष शिवाजी साळुंखे उपस्थित होते.





