पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघ: 16 उमेदवार मैदानात; 10 उमेदवारांची माघार

सासवड – पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ बनत असल्यामुळे राज्यभरात पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाची चर्चा होती. यामध्ये पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून तब्बल 10 उमेदवारांनी आपली उमेदवारी माघारी घेतली असून 16 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.
पुरंदर-हवेलीच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत ही निश्चित झाली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री विजय शिवतरे, काँग्रेसकडून आमदार संजय जगताप, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे या तिघांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असल्यामुळे पुरंदरच्या राजकीय वर्तुळामध्ये समीकरणे बदलताना दिसत आहेत. संभाजी झेंडे यांच्या हातात घड्याळाचा झेंडा हातात घेतल्यामुळे कोणाला तोटा तर कोणाला फायदा होणार हे येत्या काळात समजेल.
या अपक्ष उमेदवारांची माघार –
दत्तात्रय मारुती झुरंगे, दिगंबर गणपत दुर्गाडे, दिलीप विठ्ठल गिरमे, शंकर बबन हरपळे, संदीप ऊर्फ गंगाराम मारुती जगदाळे, अभिजीत मधुकर जगताप, संदीप बबन मोडक आकाश विश्वनाथ जगताप, जालिंदर सोपान कामठे, गणेश बबनराव जगताप.
हे उमेदवार रिंगणात –
संजय चंद्रकांत जगताप (काँग्रेस), विजय सोपानराव शिवतारे (शिवसेना, शिंगे गट ) संभाजी सदाशिव झेंडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), सुरज संजय भोसले (बहुजन समाज पार्टी), उमेश नारायण जगताप (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), संजय शहाजी निगडे (राष्ट्रीय समाज पक्ष), किर्ती श्याम माने (वंचित बहुजन आघाडी), सुरज राजेंद्र घोरपडे (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), उत्तम गुलाब कामठे (संभाजी ब्रिगेड पार्टी), अपक्ष उमेदवार : उदयकुमार वसंतराव जगताप, सुरेश बाबुराव वीर, महादेव साहेबराव खेंगरे-पाटील, अतुल महादेव नागरे, शेखर भगवान कदम, विशाल अरुण पवार, अनिल नारायण गायकवाड.


