NOC applications: महापालिकेत स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार फिल्डींग लावण्यात आली असून, आतापर्यंत सुमारे १९३ जणांनी ना हरकत प्रमाणपत्र मिळावे यासाठी अर्ज केले आहेत. तर प्रशासनाकडून आतापर्यंत सुमारे १६३ जणांना एनओसी देण्यात आली आहे. महापालिकेत १० स्वीकृत नगरसेवक नेमले जाणार आहेत. त्यात, सर्वाधिक ७ सदस्य भाजपचे असून, दोन राष्ट्रवादीचे तर एक काॅंग्रेसचा असणार आहे. महापालिका निवडणुका झाल्यानंतर आता या महिन्यात महापौर तसेच स्थायी समितीसह सर्वच विशेष समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता प्रशासनाकडून स्वीकृत सदस्य नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांनी ही प्रक्रिया महापालिकेतील राजकीय पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करून करायची आहे. ही नियुक्ती महापौर निवडीनंतर लगतच्या महिन्यातील मुख्यसभेत केली जाणार असल्याने मार्च २०२६ च्या मुख्यसभेत ही निवड केली जाणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. स्वीकृत सदस्यांसाठीही महापालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यांप्रमाणेच महापालिकेची कोणतीही देणी नसलेले ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाकडून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत १६९ अर्ज प्राप्त झाले आहेत. भाजपकडून धक्कातंत्र महापालिकेत ११९ सदस्य निवडून आल्याने महापालिकेत नियमानुसार भाजपचे सर्वाधिक सात स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. यासाठी भाजपने तब्बल ५२ जणांची यादी पक्षाच्या राज्याच्या कोअर कमिटीकडे पाठविली आहे. तर, भाजपकडून आधीच माजी नगरसेवक तसेच निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांना संधी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपकडून स्थायी समिती प्रमाणेत स्वीकृत नगरसेवक निवडीत धक्कातंत्र वापरले जाणार असल्याची शक्यता आहे. तर काॅग्रेस, राष्ट्रवादीतही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी केली जात आहे. Mahamadwadi : महंमदवाडीतील भूसंपदान नक्की कोणासाठी? महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह