मोठा निर्णय ! सिडकोची घरे विकण्यासाठी आता परवानगीची गरज पडणार नाही
Updated On:

मुंबई : ज्यांची सिडकोमध्ये घरे आहेत त्यांच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सिडकोची घरे आता जर विकायची असतील तर त्यासाठी सिडको महामंडळाच्या एनओसीची गरज लागणार नाही. तसेच दुसऱ्या व्यक्तीला घर विकायचे असेल तर त्यासाठी लागणारे शुल्कही माफ करण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे.
सिडकोचं घर लागल्यानंतर ते लीज वरती न राहता स्वतःच्या मालकीचं होणार आहे. सिडको महामंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाट यांच्याकडून देण्यात आली आहे.
सिडको महामंडळाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा सुमारे सव्वालाख लोकांना होणार आहे. या निर्णयाचा सिडको महामंडळाच्या वसुलीवर काहीसा परिणाम होणार असला तरी महसुलासाठी इतर पर्याय अवलंबले जाणार आहेत.





