Matheesha Pathirana : केकेआरसाठी आली गुड न्यूज! १८ कोटींचा ‘यॉर्कर किंग’ परतला; खचलेल्या कोलकाता संघाला मिळणार मोठं बळ
Matheesha Pathirana : आयपीएल २०२६ मध्ये विजयासाठी आसुसलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे.

Matheesha Pathirana KKR Return IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामात सलग पराभवांचा सामना करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघासाठी अखेर सुखाची बातमी आली आहे. संघाचा महागडा आणि हुकमी एक्का असलेला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना आता मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला असून, तो लवकरच संघात सामील होणार आहे.
आयपीएल २०२६ मध्ये विजयासाठी आसुसलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला अखेर दिलासा मिळाला आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानाने फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली असून श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले आहे. पथिराना १७ एप्रिल रोजी भारतात दाखल होईल आणि १९ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी तो निवडीसाठी उपलब्ध असेल.
केकेआरची कमकुवत गोलंदाजी सुधारणार?
KKR Get a Big Boost! 🔥
Matheesha Pathirana cleared to play after receiving NOC
🚀 Joining the squad very soon!#IPL #KKR #MatheeshaPathirana pic.twitter.com/TVnYJfp2GU
— Cricfeed (@AdamHus87) April 12, 2026
या हंगामात केकेआरची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. खेळलेल्या ४ सामन्यांपैकी एकाही सामन्यात त्यांना विजय मिळवता आलेला नाही, त्यामुळे संघ गुणतालिकेत तळाला आहे. हर्षित राणा आणि आकाश दीप दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत, तर वरुण चक्रवर्तीच्या खराब फॉर्ममुळे संघाच्या अडचणी वाढल्या होत्या. पहिल्या सामन्यात २२० धावांचा डोंगर उभारूनही कोलकात्याचे गोलंदाज या धावा वाचवू शकले नव्हते. अशा परिस्थितीत पथिरानाची एन्ट्री संघाचे नशीब बदलू शकते.
डेथ ओव्हर्सचा ‘स्पेशालिस्ट’ –
टी-२० वर्ल्ड कपदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे पथिराना सुरुवातीच्या सामन्यांना मुकला होता. मात्र, आता तो पूर्णपणे फिट आहे. केकेआरने त्याला लिलावात तब्बल १८ कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्याच्या विशिष्ट गोलंदाजीच्या शैलीमुळे (Slingshot Action) आणि अचूक यॉर्करमुळे तो डेथ ओव्हर्समध्ये जगातील घातक गोलंदाजांपैकी एक मानला जातो. पथिरानाच्या आगमनामुळे केकेआरच्या गोलंदाजीला धार येईल आणि संघाच्या विजयाचे खाते उघडण्याची शक्यता वाढली आहे.





