पिंपरी | कवी ना. धों. महानोर यांच्या स्मृतींना उजाळा

लोणावळा, (वार्ताहर) – निसर्ग कवी ना.धों. महानोर यांच्या पुण्यतिथी निमित्त लोणावळा येथील ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूल व ज्यूनियर कॉलेज येथे कवी ना धों महानोर यांच्या आठवणी जाग्या करत त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
सरस्वती पूजन करून कवी ना.धों.महानोर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आला. यावेळी जेष्ठ कवी लेखक सुधीर मोघे व कवयित्री शुभांगी मांडे, संस्थेच्या सचिव राधिका भोंडे,
विद्यालयाचे शैक्षणिक सल्लागार संजय पुजारी, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माधवी थत्ते, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख, माध्यमिक विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका तृप्ती गव्हले,
प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका स्मिता इंगळे, पर्यवेक्षिका स्मिता वेदपाठक व शशिकला तिकोणे यांसह शिक्षक उपस्थित होते महानोर यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यालयात शिक्षकांनी पाऊस या विषयावर काव्य निर्मिती केली.
या काव्यातून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले. यात अनुक्रमे प्रथम क्रमांक नितीन एकनाथ तिकोणे व योगेश चोरगे, द्वितीय क्रमांक सुमैया शेख व तृतीय क्रमांक चिन्मय जगधनी यांनी पटकावला. ज्येष्ठ कवी लेखक सुधीर मोघे व कवयित्री शुभांगी मांडे यांनी यावेळी वेगवेगळ्या कवींच्या कवितांचे वाचन केले.
यात प्रामुख्याने ग. दी. माडगूळकर, वसंत देशपांडे, व्यंकटेश कुलकर्णी, सुरेश भट, स्वानंद बर्वे, विठ्ठल दास यांच्या कविता सादर करण्यात आल्या. संस्थेच्या सचिव राधिका भोंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले तर भाग्यश्री पाटील व अनुप्रिता यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. नितीन तिकोणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.





