पिंपरी | द्रुतगती मार्गावरील बोगद्यात एसटी बसचा अपघात
Updated On:

लोणावळा, (वार्ताहर) – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी (दि.१९) सकाळी दहाच्या सुमारास नवीन बोगद्यात एसटी बसचा अपघात झाला. द्रुतगती मार्गावर किलोमीटर ३९ येथे झालेल्या अपघातात बसमधील ६ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
सुदैवाने अपघाताची तीव्रता अधिक नसल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने जात असलेल्या एसटी बसचा (क्रमांक एमएस १४ बीटी ४९८९) ब्रेक निकामी झाला.
त्यामुळे बसने पुढील वाहनाला (क्रमांक एमएच १४ केए ७४०२) धडक दिली. घटनेची माहिती मिळताच आयआरबी वाहतूक पोलीस अन्य बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि वाहतूक सुरळीत केली.





