Nitto ATP Finals 2024 : बोपण्णा-एब्डन जोडीची अंतिम फेरीत धडक….

Nitto ATP Finals 2024 (Bopanna-Ebden Pair) :- भारतीय टेनिस स्टार रोहन बोपण्णा व ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एब्डन यांनी एटीपी टेनिसच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. नॅथॅनियल लेमन्स आणि जॅक्सन विथरो ही जोडी रोलेक्स पॅरिस मास्टर स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर बोपण्णा व एब्डन यांच्या जोडीने स्पर्धेतील सहभाग निश्चित केला.
ट्यूरिन येथे 10 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत बोपण्णा व एब्डन यांच्याबरोबरीने वेस्ली कूलहॉफ आणि निकोला निकोला मॅक्टिक, केविन क्रॅविट्झ आणि टिम पुएत्झ, हॅरी हेलिओवारा आणि हेनरी पॅटेन, मार्सेलो अरेव्हालो आणि मेट पॅव्हिक, मार्सेल ग्रॅनोलर्स आणि होरासिओ झेबॉलोस, सायमन बोल्ली आणि आणि अँड्रिया वावसोरी व मॅक्स पर्सेल आणि जॉर्डन थॉम्पसन या आठ जोड्या पुरुष गटातून सहभागी होणार आहेत.
India’s Rohan Bopanna & Matthew Ebden secure their spot at the #NittoATPFinals.
Get ready for thrilling tennis action!😎@IndiaSports @Media_SAI @atptour @AITA__Tennis @rohanbopanna @mattebden pic.twitter.com/ra6EDKWbqt
— Doordarshan Sports (@ddsportschannel) October 29, 2024
बोपण्णा व एब्डन यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावून या हंगामाची दमदार सुरुवात केली होती. भारताचा बोपण्णा सध्या 43 वर्षणाचा असून लवकरच तो 44 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दरम्यान या जोडीने मियामी ओपन स्पर्धेचे देखील विजेतेपद पटकावले होते.
IND vs NZ 3rd ODI : न्यूझीलंडचे भारतासमोर माफक आव्हान, दीप्ती शर्मानं घेतले 3 बळी…
बोपण्णा व एब्डन यांच्या जोडीने सलग दुसऱ्यांदा एटीपीच्या अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. गतवर्षी त्यांना मार्सेल ग्रॅनोलर्स आणि होरासिओ झेबॉलोस यांच्या जोडीने पराभूत केले होते. त्यामुळे रोहन बोपण्णा या स्पर्धेत विजेतेपदाच्या दृष्टिकोनातून खेळेल. यापूर्वी त्याने 2012 मध्ये महेश भूपती व 2015 मध्ये फ्लोरिन मर्झियासोबत खेळताना अंतिम फेरीत गाठली होती.





