China Open 2024 : बोपण्णा-डोडिग यांचे आव्हान संपुष्टात….

China Open 2024 :- भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णा व क्रोएशियाचा इव्हान डोडिग यांना चायना ओपन टेनिस स्पर्धेच्या राउंड ऑफ १६ फेरीत पराभूत व्हावे लागल्याने स्पर्धेतील त्याचे दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. बोपण्णा व डोडिग यांच्या जोडीला अर्जेंटिनाच्या फ्रान्सिस्को सेरुंडोलो व चिलीच्या निकोलस जॅरी यांच्या बिगरमानांकीत जोडीने ५-७, ६-७ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.
पहिल्या व दुसऱ्या सेटमध्ये बोपण्णा व डोडिग यांच्या जोडीने लढत देण्याचा प्रयत्न केला, परंतु ते दोन्ही सेटमध्ये अपयशी ठरले. रोहन बोपण्णाचा नियमित जोडीदार असलेला ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडेनने या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे क्रोएशियाचा इव्हान डोडिगच्या साथीत घेऊन बोपण्णा स्पर्धेत सहभागी झाला होता.
ENG vs AUS 5th ODI : हेडची अष्टपैलू कामगिरी, इंग्लंडला नमवून ऑस्ट्रेलियानं मालिकेवर केला कब्जा..
यापूर्वी बोपण्णाने डोडिगसह २०१७ व २०२१ मध्ये सहभागी झाला होता. २०१७ च्या हंगामात या जोडीने एटीपी मॉन्ट्रियल मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. बोपण्णाने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम आणि मियामी ओपनचे विजेतेपद पटकावले आहे.





