Nitish Rana Record : नितीश राणाची तुफान फटकेबाजी! शतक हुकलं पण एकाच ओव्हरमध्ये ६ बाउंड्री मारून बार्टलेटची काढली हवा, पाहा VIDEO
Nitish Rana Record : नितीश राणाने अवघ्या २९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, खरा थरार १२ व्या षटकात पाहायला मिळाला.

Nitish Rana 91 runs vs PBKS IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या ३५ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने आले होते. अरुण जेटली स्टेडियमवरील या सामन्यात नितीश राणाने आपल्या वादळी फलंदाजीने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने केवळ पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला नाही, तर आयपीएल कारकिर्दीतील एक मोठा टप्पाही गाठला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा धडाकेबाज फलंदाज नितीश राणा सध्या प्रचंड फॉर्मात आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याने मैदानावर अक्षरशः धुमाकूळ घातला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीची सुरुवात पथुम निसांका लवकर बाद झाल्याने डळमळीत झाली होती. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या राणाने मैदानाचा ताबा घेतला आणि पंजाबच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले.
बार्टलेटच्या एका ओव्हरमध्ये कुटल्या २८ धावा –
Home is where the MAXIMUMS are! 🚀
🎥 Nitish Rana is putting on a ball-striking exhibition in New Delhi 🏟️
Updates ▶️ https://t.co/0oSkMZgNAV#TATAIPL | #KhelBindaas | #DCvPBKS | @NitishRana_27 | @DelhiCapitals pic.twitter.com/KY65dyokn4
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
नितीश राणाने अवघ्या २९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, खरा थरार १२ व्या षटकात पाहायला मिळाला. पंजाबचा गोलंदाज झेव्हियर बार्टलेट गोलंदाजीसाठी आला आणि राणाने त्याच्या प्रत्येक चेंडूवर प्रहार केला. षटकाची सुरुवात षटकाराने केल्यानंतर त्याने सलग चार चौकार लगावले आणि शेवटच्या चेंडूवर पुन्हा एक षटकार खेचला. अशा प्रकारे त्याने एकाच षटकात २८ धावा वसूल करून पंजाबची लय बिघडवली.
शतक हुकलं, पण विक्रम रचला!
Capitalising on the big stage! 🎯
Nitish Rana powers his way into the elite 3K club in the #TATAIPL 💥
Updates ▶️ https://t.co/0oSkMZgNAV#KhelBindaas | #DCvPBKS | @NitishRana_27 | @DelhiCapitals pic.twitter.com/6J89cL5cmS
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
या वादळी खेळीदरम्यान नितीश राणाने आयपीएलमध्ये आपल्या ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने केवळ ४४ चेंडूत ९१ धावांची स्फोटक खेळी केली, ज्यामध्ये ११ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. दुर्दैवाने, ज्या बार्टलेटला त्याने २८ धावा कुटल्या होत्या, त्याच गोलंदाजाने त्याला ९१ धावांवर बाद केले आणि राणाचे शतक अवघ्या ९ धावांनी हुकले. गेल्या सामन्यात ५७ धावा करणाऱ्या राणाने पुन्हा एकदा आपल्या फटकेबाजीने दिल्लीला मजबूत स्थितीत पोहोचवले आहे.





