KL Rahul Century : केएल राहुलचा ऐतिहासिक धमाका! ख्रिस गेल आणि रोहित शर्माच्या विक्रमांशी केली बरोबरी; दिल्लीच्या मैदानात शतकी वादळ
KL Rahul Century : केएल राहुलने ४७ चेंडूत शतक ठोकत आयपीएल कारकिर्दीतील आपले ६ वे शतक नोंदवले.

KL Rahul Century vs PBKS IPL 2026 : अरुण जेटली स्टेडियमवर पंजाब किंग्सविरुद्ध खेळताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली होती. तिसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगने दिल्लीला मोठा धक्का दिला. मात्र, त्यानंतर सलामीवीर केएल राहुलने नितीश राणासोबत मिळून प्रतिहल्ला चढवला. राहुलने १० व्या षटकात संघाला १०० धावांच्या पार नेले आणि १५ व्या षटकात आपले शानदार शतक पूर्ण केले.
ख्रिस गेलच्या विक्रमाशी केली बरोबरी –
केएल राहुलने ४७ चेंडूत शतक ठोकत आयपीएल कारकिर्दीतील आपले ६ वे शतक नोंदवले. यासह त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्यांच्या यादीत ख्रिस गेलची (६ शतके) बरोबरी केली आहे. आता राहुल केवळ विराट कोहली (८ शतके) आणि जोस बटलर (७ शतके) यांच्या मागे आहे.
Loud and KLear 🫡
A magnificent 4️⃣7️⃣-ball TON for KL Rahul 👏
Updates ▶️ https://t.co/0oSkMZgNAV#TATAIPL | #KhelBindaas | #DCvPBKS | @klrahul | @DelhiCapitals pic.twitter.com/8XsGGMdB7Q
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
टी-२० क्रिकेटमध्ये ‘हिटमॅन’ची केली बरोबरी –
केवळ आयपीएलच नव्हे, तर एकूण टी-२० क्रिकेटमध्येही केएल राहुलने मोठी झेप घेतली आहे. त्याचे हे टी-२० कारकिर्दीतील ८ वे शतक ठरले असून, या बाबतीत त्याने रोहित शर्मा आणि संजू सॅमसन यांची बरोबरी केली आहे. आता भारतीय खेळाडूंमध्ये केवळ विराट कोहली (९ शतके) त्याच्या पुढे आहे.
Unstoppable Mayhem 😮
Nitish Rana 🤝 KL Rahul
How entertained are you with this partnership? 🤌
Updates ▶️ https://t.co/0oSkMZgNAV#TATAIPL | #KhelBindaas | #DCvPBKS | @DelhiCapitals | @NitishRana_27 | @klrahul pic.twitter.com/vHjKtmsc2S
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
आयपीएलमधील सर्वाधिक शतकं ठोकणारे खेळाडू:
- विराट कोहली – ८
- जोस बटलर – ७
- ख्रिस गेल – ६
- केएल राहुल – ६
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारे भारतीय खेळाडू:
- विराट कोहली – ९
- रोहित शर्मा – ८
- संजू सॅमसन – ८
- केएल राहुल – ८





