Politics News : राजकारणात मोठी उलथापालथ; मुख्यमंत्री राजीनामा देणार, नवे सरकार स्थापन होणार
Politics News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार लवकरच राजीनामा देऊन केंद्रात जाणार आहेत. १० एप्रिलला ते राज्यसभेची शपथ घेणार असून १५ एप्रिलपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

Politics News : बिहारच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत असून सत्तांतराच्या हालचालींना वेग आला आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार लवकरच पदाचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारीही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. (Politics News)
सरकार स्थापनेच्या प्रक्रियेबाबत माहिती देताना मंत्री विजय चौधरी यांनी महत्त्वाची टाइमलाइन स्पष्ट केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 9 एप्रिल रोजी नितीश कुमार दिल्लीला रवाना होणार असून 10 एप्रिल रोजी ते राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतील. त्यानंतर बिहारमध्ये नव्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा होईल.
सूत्रांच्या माहितीनुसार, 11 आणि 12 एप्रिल दरम्यान नितीश कुमार दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते पाटण्यात परतून राज्यपालांकडे राजीनामा सादर करतील. (Politics News)
कधी होणार शपथविधी?
13 एप्रिल रोजी मंत्रिमंडळाची अंतिम बैठक होण्याची शक्यता असून त्यात महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. त्यानंतर 14 एप्रिलला राजीनामा दिला जाईल आणि 14 किंवा 15 एप्रिल रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवा मुख्यमंत्री कोण?
सध्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत सस्पेन्स कायम आहे. एनडीएतील सर्व घटक पक्षांची बैठक होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. संभाव्य नावांवर चर्चा सुरू असून लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
एकूणच, बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याच्या उंबरठ्यावर राज्य उभे असून, पुढील काही दिवसांत सत्ता समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. (Politics News




