Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ‘या’ दिवशी राजीनामा देणार
नितीश कुमार (Nitish Kumar) १६ मार्च २०२६ रोजी राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले होते.

Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) हे ३० मार्च २०२६ रोजी आपल्या विधान परिषद (MLC) सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. घटनेनुसार, एक व्यक्ती एकाच वेळी दोन सभागृहांचे सदस्य म्हणून काम करू शकत नाही.
नितीश कुमार (Nitish Kumar) १६ मार्च २०२६ रोजी राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यामुळे त्यांना १४ दिवसांच्या आत विधान परिषद किंवा राज्यसभा पैकी एका पदाचा राजीनामा देणे बंधनकारक आहे.
या नियमाचा विचार करता, नितीश कुमार यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा ३० मार्च २०२६ रोजी देणे जवळपास निश्चित मानले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ते या दिवशी आपला MLC पदाचा राजीनामा विधान परिषदेच्या अध्यक्षांकडे सादर करतील.
नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी १६ मार्च रोजी राज्यसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. राज्यसभा सदस्यत्व स्वीकारल्यानंतर घटनेच्या तरतुदींनुसार त्यांना विधान परिषदेचे सदस्यत्व सोडावे लागणार आहे. नितीश कुमार यांच्या या राजीनाम्यानंतर बिहार विधान परिषदेत एक जागा रिक्त होणार आहे. या जागेवर कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.






