Bihar Election : बिहारमधील नवीन एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा उद्या (20 नोव्हेंबर) पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर होणार आहे. त्यापूर्वी, आज NDA ची महत्वाची बैठक पार पडली, या बैठकीत नितीश कुमार यांना विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले आहे. म्हणजेच, नितीश कुमार मुख्यमंत्री होणार, यावर आज अखेर शिक्कामोर्तब झालय. भाजप नेते सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, जो एकमताने मंजूर करण्यात आला. आता नितीश कुमार राजभवनात जाऊन राजीनामा देतील आणि सरकार स्थापनेचा दावा करतील. तर, उद्या सकाळी भव्य शपथविधी सोहळ्यात 10 व्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिंहा उप-मुख्यमंत्रिपदाची शपत घेतील.