Bihar Election Result 2025। बिहार निवडणूक निकाल 2025 चे पहिले कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलामध्ये भाजपप्रणित NDA ने १५६ जागांवर आघाडी घेतली. महाआघाडीची ८२ जागांवर आघाडी घेतली. त्यात तेजस्वी यादव यांचा RJD पक्षाने सर्वाधिक 69 जागांवर आघाडी घेतली. दरम्यान सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएमधील भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र जस जसे कल समोर येत होते तसे आकडे बदलत जाऊन एनडीएमध्ये जेडीयू मोठा पक्ष ठरला आहे. तर चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) सात जागांवर आणि एचएएम (एस) एका जागेवर आघाडीवर आहेत. एचएमएस चार जागांवर, सीपीआय(एमएल) दोन जागांवर आणि इतर आणि सहा जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. एकूण १९२ जागांसाठी ट्रेंड उपलब्ध आहेत. Bihar Election Result 2025।