Chief Minister of Bihar : बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग! लवकरच अंतिम निर्णय; मुख्यमंत्री पदाचा सस्पेंन्स संपणार? वाचा सविस्तर

Chief Minister of Bihar : बिहार राज्यात मुख्यमंत्री कोणा होणार? यावर चर्चा सुरू असून, याचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

Updated On:
Photo 1

Chief Minister of Bihar : देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा बिहार राज्याची जोरदार चर्चा आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार केंद्रीय स्तरावरील राजकारणात सक्रिय होत असल्याने ते लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. यामुळे बिहारमध्ये भाजपचा पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपद होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आता नव्या सरकारच्या स्थापनेसाठी पाटण्यापासून ते दिल्लीपर्यंत वेगवान राजकीय हालचाली घडत आहेत. पडद्यामागे राजकीय समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता नवीन माहितीनुसार, सत्ताधारी जेडीयू आणि भाजपने मंगळवारी आपल्या आमदारांच्या बैठका बोलावल्या आहेत. तसेच एनडीएचीही महत्त्वाची बैठक विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार असून त्यात नव्या मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित राहणार आहेत. Chief Minister of Bihar

Chief Minister of Bihar

Chief Minister of Bihar : बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग! लवकरच अंतिम निर्णय; मुख्यमंत्री पदाचा सस्पेंन्स संपणार? वाचा सविस्तर

दरम्यान, नितीश कुमार यांनी सकाळी 11 वाजता कॅबिनेट बैठक बोलावली असून यामध्ये ते राजीनाम्याबाबत औपचारिक घोषणा करू शकतात. त्यानंतर ते राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्त करतील, अशी शक्यता आहे. Chief Minister of Bihar

बिहारमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, भाजपमधील तीन नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे जर भाजपला मुख्यमंत्री पद मिळाले तर कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून काही नावांची चर्चा सुरू आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे. याशिवाय केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचाही पर्याय समोर येत आहे. तसेच भाजपकडून एखाद्या नव्या किंवा ओबीसी नेतृत्वाला संधी देण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. थोडक्यात पक्षाचे केंद्रीय नेतृत्व कोणाच्या नावाला पंसती देणार? याची उत्सुकता लवकरच संपणार आहे.

नितीश कुमार यांच्या निर्णयामागची कारणे

नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याचा विचार केल्याच्या चर्चांमुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा. केंद्रातील राजकारणात भूमिका वाढवण्याचा प्रयत्न.
राज्यातील सत्तेची जबाबदारी भाजपकडे देण्याचा राजकीय निर्णय.

भाजपची रणनीती काय असू शकते?

भारतीय जनता पक्ष बिहारमध्ये पहिल्यांदाच पूर्णपणे नेतृत्व आपल्या हाती घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत.

स्वतःचा मुख्यमंत्री देऊन राज्यातील पकड मजबूत करणे.
आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक बळ वाढवणे.
ओबीसी किंवा प्रादेशिक संतुलन साधणारा चेहरा पुढे आणणे.

संभाव्य मुख्यमंत्री पदाचे चेहरे

सम्राट चौधरी – सध्या सर्वात आघाडीवर.
नित्यानंद राय – संघ पार्श्वभूमी आणि अनुभव.
याशिवाय एखादं “सरप्राइज नाव” समोर येण्याचीही शक्यता.

 जेडीयूची भूमिका

जनता दल (युनायटेड) (JDU) सध्या सत्तेत सहभागी असला तरी नितीश कुमार यांच्या निर्णयानंतर पक्षाची ताकद कमी होऊ शकते. भाजपसोबतची समीकरणे बदलण्याची शक्यता.

आकड्यांचं गणित

बिहार विधानसभेतील बहुमत आधीच एनडीएकडे आहे, त्यामुळे सरकार स्थापन करण्यात अडचण येणार नाही. मात्र नेतृत्व बदलल्याने सत्तेचा “पॉवर बॅलन्स” बदलणार असून मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Mumbai News: हाय-प्रोफाईल पार्टीवर पुन्हा प्रश्नचिन्ह; मुंबईच्या कॉन्सर्टमधील धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : मतचोरीची किंमत चुकवावी लागेल; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांच्यासह मोदी, शहांना इशारा

Rahul Gandhi : मतचोरीची किंमत चुकवावी लागेल; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांच्यासह मोदी, शहांना इशारा

Devendra Fadnavis : सत्तापरिवर्तन हवे असेल, तर निवडणुकीच्या रिंगणात उतरा; देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

Devendra Fadnavis : सत्तापरिवर्तन हवे असेल, तर निवडणुकीच्या रिंगणात उतरा; देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

Amit Shah : अभाविपच्या विजयाने तरुणाई भाजपाच्या जवळ; केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले मत

Amit Shah : अभाविपच्या विजयाने तरुणाई भाजपाच्या जवळ; केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले मत

Tarun Chugh : काॅंग्रेसमुळेच लोकशाही धोक्यात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांचा आरोप

Tarun Chugh : काॅंग्रेसमुळेच लोकशाही धोक्यात; भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुघ यांचा आरोप