Nitin Gadkari : फ्लेक्स-इंधन तंत्रज्ञानामुळे मायलेजची कोणतीही समस्या नाही; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
Nitin Gadkari : वाहनांचे मायलेज हे केवळ ते कोणत्या इंधनावर चालतात यावर नव्हे, तर चालवण्याच्या (ड्रायव्हिंगच्या) परिस्थितीवर अधिक अवलंबून असते," असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

Nitin Gadkari : वाहनांचे मायलेज हे केवळ इंधनावर नाही, तर ड्रायव्हिंगच्या परिस्थितीवरही अवलंबून असते, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. दिल्ली किंवा मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीमुळे गाड्या बहुतांश वेळा कमी गिअरमध्ये चालवाव्या लागतात, ज्याचा थेट परिणाम मायलेजवर होतो, असे गडकरी म्हणाले. (Nitin Gadkari)
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय)अहवालाचा हवाला देत गडकरींनी स्पष्ट केले की, ज्या गाड्या खास फ्लेक्स-इंधन इंजिन लक्षात ठेवून तयार केल्या आहेत, त्यांच्या मायलेजमध्ये कोणतीही समस्या येत नाही. याच कारणामुळे सरकार आता देशात फ्लेक्स-इंजिन तंत्रज्ञानाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यावर भर देत आहे. (Nitin Gadkari)
देशातील इंधनाचा पर्याय बदलण्याच्या दिशेने पावले टाकली जात असून, गडकरींनी सांगितले की, भारतातील जवळपास एक डझन कार उत्पादक कंपन्या आता फ्लेक्स मॉडेल्स विकसित करण्यावर वेगाने काम करत आहेत. ब्राझीलचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, ब्राझील १९७० पासून २७ टक्के इथेनॉल मिश्रित इंधनाचा यशस्वीपणे वापर करत आहे. (Nitin Gadkari)
आमचे मुख्य उद्दिष्ट जनतेला विविध पर्याय उपलब्ध करून देणे आहे. इथेनॉलची किंमत सध्या प्रति लिटर सुमारे ७५ रुपये आहे. त्यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीत विविध ब्लेंड्सचे (मिश्रणांचे) पर्याय मिळतील. फ्लेक्स-इंधन तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे देशातील सर्वसामान्यांना स्वस्त इंधनाचा पर्याय तर मिळेलच, शिवाय कच्च्या तेलाची आयात कमी होऊन पर्यावरणालाही मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (Nitin Gadkari)





