Maharashtra Politics : राष्ट्रवादीला मोठा धक्का; नवाब मलिक यांच्या पुतणीचे नगरसेवकपद रद्द
Maharashtra Politics : मुंबई महानगरपालिकेच्या वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Maharashtra Politics : मुंबई महानगरपालिकेतील एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकी एका महिला नगरसेविकेचे जात वैधता प्रमाणपत्र तपासणीत अवैध ठरले आहे. त्यामुळे या दोन्ही नगरसेविकांना शुक्रवारी पालिका सदस्यत्वासाठी अपात्र घोषित करण्यात आले. (Maharashtra Politics)
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अधिकृतपणे ही घोषणा केली. या कारवाईमुळे गेल्या अवघ्या एका महिन्यात जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मुंबई महानगरपालिकेतून अपात्र ठरलेल्या नगरसेवकांची एकूण संख्या आता ४ झाली आहे. (Maharashtra Politics)
रोशन शेख या एमआयएमच्या नगरसेविका असून त्या वॉर्ड क्रमांक १३८ मधून निवडून आल्या होत्या. त्यांना अपात्र ठरवले असून त्यांच्यासोबतच बुशरा नदीम मलिक या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुर्ला पूर्व येथील वॉर्ड क्रमांक १७० च्या नगरसेविकाही अपात्र ठरल्या. (Maharashtra Politics)
दरम्यान, गेल्याच महिन्यात अशाच प्रकारे आणखी दोघांना अपात्र करण्यात आले होते. यामध्ये गोवंडी येथील वॉर्ड क्र. १३७ चे एमआयएम नगरसेवक शमीर रमझान पटेल आणि भांडुप (एस वॉर्ड) वॉर्ड क्र. १११ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक दीपक सावंत यांचा समावेश होता. समितीने जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवल्याने या दोघांचेही पद रद्द करण्यात आले होते. (Maharashtra Politics)
बुशरा मलिक यांचे नगरसेवकपद रद्द
बुशरा मलिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या पुतणी आणि कॅप्टन मलिक यांच्या कन्या आहेत. बुशरा मलिक यांची सदस्यता नेमक्या कोणत्या कारणामुळे रद्द करण्यात आली, याची माहिती जात पडताळणी समितीचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या कागदपत्र पडताळणीसंदर्भातील एकूण 89 प्रकरणे प्रलंबित असून, त्यापैकी 19 प्रकरणे जात प्रमाणपत्राशी संबंधित आहेत. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : राज्यातील सर्वात मोठी घडामोड; भाजप-शरद पवार गट एकत्र, राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics : ठाकरे गटात मोठा भूकंप ! 12 नगरसेवक बंड करणार? थेट पत्रकार परिषद घेत…





