Nitesh Rane : “मर्सिडिज सोडा उद्धव ठाकरेंचे अंतर्वस्त्रही…”, नितेश राणेंनी ठाकरेंचं सगळंच काढलं

दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एका चर्चासत्रात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हें यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर आता बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी जोरदार टीका केली.
काय म्हणाले नितेश राणे?
“उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब आजपर्यंत आलेल्या अनुभवाने मी सांगतो. आमचे वडील ३९ वर्षे शिवसेनेत होते. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय आजपर्यंत स्वत:च्या पैशाने जेवलेले देखील नाहीत. हॉटेलचं बीलही ते देत नाही. घरातला एसीही व्हिडीओकॉनचा लावला होता. त्यामुळेच राजकुमार धूत यांना खासदारकी दिली होती. बाहेरगावचे तिकीट किंवा अंतर्वस्त्राचे पैसेही ते स्वत: देत नाही. तुम्हाला मी दुकानाचं नावही देऊ शकतो”, अशी टीका नितेश राणेंनी केली.
संजय राऊतांना दिले चॅलेंज
मालकाचे वस्त्रहरण करायचं असेल तर एक खुली पत्रकार परिषद घे आणि माझ्या बाजूला बस, आम्ही तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या गाड्या, कपडे, जेवण कुठून येतो हे सांगतो. आताही उद्धव ठाकरेंच्या घराची लाँड्री ही लीला हॉटेलमधून केली जाते. त्यावर यादव हे नाव दिलं जातं. त्याची मी रिसीट दाखवू शकतो. आताही त्यांच्या घरात जे सँडविच जातात ते ट्रायडेंट हॉटेलमधून जातात. त्यामुळे संजय राऊतांना मी सांगेन की मला तोंड उघडायला लावू नका. नीलम गोऱ्हे जे काही बोलल्या आहेत, ते योग्य आहे. जर अजून तुमच्या मालकाचं वस्त्रहरण करायचं असेल तर बोलत राहा. आम्ही अजून माहिती देत राहू” असे नितेश राणे म्हणाले.





