Asian Para Gold : नागोयामध्ये भारताची सुवर्ण सकाळ; नितेश कुमारने बॅडमिंटनमध्ये तर हरविंदर-विजयने तिरंदाजीत पटकावलं सुवर्णपदक
Asian Para Gold : शुक्रवार भारतासाठी दुहेरी आनंदाचा दिवस ठरला. बॅडमिंटनपटू नितेश कुमार आणि पुरुषांच्या तिरंदाजी संघाने सुवर्णपदके पटकावली, तर प्रमोद भगत यांच्यासह अनेक खेळाडूंनी रौप्यपदके मिळवली.

Nitesh Kumar and Harvinder-Vijay Archery Duo Win Gold in Asian Para Games 2026 : जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये शुक्रवार, २३ ऑक्टोबरची सकाळ भारतासाठी पदकांची मोठी भेट घेऊन आली. भारतीय पॅरा खेळाडूंनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन करत एकापाठोपाठ एक दोन सुवर्ण आणि अनेक रौप्य पदके आपल्या नावावर केली. पॅरा बॅडमिंटनमध्ये नितेश कुमारने सुवर्णपदक पटकावले, तर तिरंदाजीत हरविंदर सिंग आणि विजय सुंडी यांच्या जोडीने अचूक वेध घेत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. या शानदार कामगिरीमुळे पदक तालिकेत भारताचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.
पॅरा बॅडमिंटन फायनलमध्ये दोन भारतीयांचा थरार; नितेशला सुवर्ण –
पुरुषांच्या एकेरी SL3 बॅडमिंटन प्रकारातील अंतिम सामन्यात दोन भारतीय पॅरालिम्पिक विजेते आमनेसामने आले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत नितेश कुमारने भारताचाच ३८ वर्षीय अनुभवी स्टार खेळाडू प्रमोद भगत याला २१-१८, २१-१६ अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत दिमाखात सुवर्णपदक जिंकले. या पराभवामुळे २०१८ आणि २०२२ च्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या प्रमोद भगतला यंदा रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
GOLDEN GLORY FOR NITESH KUMAR! 🇮🇳🥇🏸
Reigning Paralympic Champion Nitesh Kumar (TOPS | WR-1) claims GOLD in Men’s Singles SL3 at the #AsianParaGames2026! 🇮🇳🏆
Nitesh defeated compatriot and reigning World Champion Pramod Bhagat (TOPS | WR-2) 2–0 (21–18, 21–16) in an all-Indian final to seal the title! 🔥👏
INDIA RULES THE SL3 PODIUM! 🇮🇳🥇🥈
For the second consecutive edition, India finishes with 1 GOLD & 1 SILVER in this event, matching its 2022 medal tally! 💪✨
A champion’s performance. A golden moment for India! 🇮🇳🥇
#Cheer4Bharat #AsianParaGames2026 #ParaBadminton
— SAI Media (@Media_SAI) October 23, 2026
तिरंदाजीत हरविंदर-विजय जोडीकडून चीनचा ५-१ ने धुव्वा –
GOLDEN GLORY FOR HARVINDER SINGH & VIJAY SUNDI! 🇮🇳🥇🏹
India strikes GOLD in Para Recurve Men’s Doubles at the #AsianParaGames2026! 🇮🇳🏆
TOPS athlete Harvinder Singh and debutant Vijay Sundi delivered a stellar performance, defeating China’s Lixue Zhao and Duo Yun 5–1 in the final to clinch the GOLD MEDAL! 🥇👏
Harvinder upgrades his medal from BRONZE in 2022 to GOLD in 2026, having won bronze alongside Sahil at the previous edition. Meanwhile, debutant Vijay caps off his Asian Para Games campaign with a historic gold medal! 🇮🇳✨
Congratulations to Harvinder Singh and Vijay Sundi on this golden achievement! 🥇💪
#Cheer4Bharat #AsianParaGames2026 #ParaArchery
— SAI Media (@Media_SAI) October 23, 2026
भारताला दिवसातील दुसरे सुवर्णपदक तिरंदाजीच्या मैदानात मिळाले. पॅरा रिकर्व्ह पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या हरविंदर सिंग आणि विजय सुंडी या जोडीने चीनच्या बलाढ्य जोडीचा ५-१ असा एकतर्फी धुव्वा उडवला. पहिल्या सेटमध्ये ३५-३५ अशी बरोबरी झाल्यानंतर भारतीय जोडीने दुसरा सेट ३७-३६ आणि तिसरा सेट ३८-३६ अशा फरकाने जिंकत सुवर्णपदकावर भारताचे नाव कोरले. दुसरीकडे, महिला पॅरा रिकर्व्ह दुहेरीत भावना चौधरी आणि पूजा जातिया जोडीला चीनविरुद्ध ०-६ असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदक मिळाले.
तुलसीमती मुरूगेसनला रौप्य; अजून दोन सुवर्णपदकांची संधी –
महिलांच्या SU5 वर्गवारीतील बॅडमिंटन अंतिम सामन्यात २४ वर्षीय भारतीय खेळाडू तुलसीमती मुरूगेसन हिला चीनच्या यांग कियुशियाविरुद्ध १८-२१, ११-२१ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला आणि तिला रौप्यपदक मिळाले. पॅरिस पॅरालिम्पिकची रौप्यपदक विजेती तुलसीमती अजूनही दोन सुवर्णपदकांच्या शर्यतीत कायम आहे. ती मिश्र दुहेरीत नितेश कुमारसोबत आणि महिला दुहेरीत मानसी जोशीसोबत अंतिम सामने खेळणार असल्याने तिच्याकडून आणखी सुवर्णाची अपेक्षा आहे.
प्रमोद बिजारनियाचे १५०० मीटरमध्ये रौप्य; काय आहे T46 वर्गवारी?
SILVER STRIKE BY PARMOD! 🇮🇳🥈🔥
A stunning podium finish for India! 🇮🇳✨
Parmod races to SILVER in the Men’s 1500m T46 at the #AsianParaGames2026, showcasing grit, determination and the fighting spirit of Indian para athletics! 🏃♂️💪
One race. One incredible achievement. One more moment of pride for India! 🇮🇳🥈
#Cheer4Bharat #AsianParaGames2026 #ParaAthletics #TeamIndia #SilverMedal
— SAI Media (@Media_SAI) October 23, 2026
ट्रॅक आणि फिल्डवर पुरुषांच्या १५०० मीटर T46 शर्यतीत भारताच्या प्रमोद बिजारनियाने ४ मिनिट ०९.६५ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक जिंकले. या प्रकारात श्रीलंकेच्या वाहुमपुरागेने विक्रमी वेळेसह सुवर्ण जिंकले. पॅरा ॲथलेटिक्समधील T46 वर्गवारी ही अशा खेळाडूंसाठी असते जे धावू शकतात, परंतु त्यांच्या हातामध्ये किंवा कोपऱ्याच्या वर/खाली गंभीर दिव्यांगत्व असते. अशा शारीरिक आव्हानावर मात करून प्रमोदने तिरंगा फडकवला.





