PM Modi : मोठी घडामोड..! केंद्रीय मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा; मोदी मंत्रिमंडळात खळबळ
PM Modi : केंद्रातील मोदी सरकारमधून आज एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्र्याने आपल्या मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

PM Modi : केंद्रातील मोदी सरकारमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेचा सहा वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी न दिल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा तात्काळ प्रभावाने मंजूर केला आहे. (PM Modi)
राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. या घडामोडीनंतर मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. (PM Modi)
जॉर्ज कुरियन यांनी का दिला राजीनामा?
जॉर्ज कुरियन यांचा राज्यसभेतील कार्यकाळ नुकताच संपला आहे. भाजपने त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय न घेतल्याने त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कुरियन यांच्याकडे अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री तसेच मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री अशी जबाबदारी होती. २०२४ मध्ये ख्रिश्चन समाजात पक्षाचा जनाधार वाढवण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून त्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. (PM Modi)
कोण आहेत जॉर्ज कुरियन?
६५ वर्षीय जॉर्ज कुरियन हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून पक्षाच्या स्थापनेपासून ते भाजपशी जोडलेले आहेत. त्यांचा जन्म केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात झाला. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले असून सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणूनही काम केले आहे. (PM Modi)
राजकारणातील त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री ओ. राजगोपाल यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणूनही काम पाहिले आहे. (PM Modi)

२०२४ मध्ये मंत्रिमंडळात समावेश
९ जून २०२४ रोजी जॉर्ज कुरियन यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर ११ जून रोजी त्यांनी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला होता. (PM Modi)
फेरबदलांच्या चर्चांना वेग
कुरियन यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी राजकीय आणि संघटनात्मक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्व कोणते निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (PM Modi)





