Coaching Center Fire : दुर्दैवी घटना..! कोचिंग सेंटरला भीषण आग; १४ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू
Coaching Center Fire : एका कोचिंग सेंटर असलेल्या व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली. या हृदयद्रावक दुर्घटनेत किमान १४ निष्पाप विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Coaching Center Fire : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील अलीगंज परिसरात सोमवारी एका कोचिंग सेंटर असलेल्या व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागून किमान 14 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Coaching Center Fire)
या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाची पथके घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. (Coaching Center Fire)
प्राथमिक माहितीनुसार, आग इतक्या वेगाने पसरली की जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी इमारतीच्या वरच्या मजल्यांवरून उड्या मारल्या. धुरामुळे आणि आगीमुळे अनेक जण आत अडकले होते. घटनास्थळी मोठ्या संख्येने अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून बचाव मोहीम सुरू आहे. (Coaching Center Fire)

घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किट हे संभाव्य कारण मानले जात आहे. अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Coaching Center Fire)
Corrupt Authorities, Businessmen/Builders who don’t care about safety and pay bribe to avoid scrutiny – end result: Dead Bodies and shattered families #Lucknow pic.twitter.com/GbsosqCfcM
— Mihir Jha (@MihirkJha) June 22, 2026
या दुर्घटनेनंतर कोचिंग संस्थांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यापूर्वीही लखनौतील अनेक कोचिंग संस्थांमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबत प्रशासनाने निरीक्षणे नोंदवली होती. (Coaching Center Fire)





