Zee Marathi Serial : लोकप्रिय अभिनेत्याचे १२ वर्षांनी कमबॅक; ‘या’ मालिकेतील पहिली झलक समोर
Zee Marathi Serial : अभिनेता ‘सनई चौघडे’ मालिकेत पुन्हा एकदा सत्यजित ही भूमिका साकारणार आहे.

Zee Marathi Serial : ‘तू तिथे मी’ या मालिकेतील सत्यजित अर्थात अभिनेता चिन्मय मांडेकर 12 वर्षांनी पुन्हा परतणार आहे. या मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठ्या प्रमाणात होता. यातील मंजिरीची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिस साकारली होती.
आता सत्यजितला पुन्हा एकदा नव्या मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. हा सत्यजित ‘झी मराठी’च्या ‘सनई चौघडे’ मालिकेत एन्ट्री घेणार आहे.
“अगदी योग्य मुहूर्तावर होणार सत्यजितची दणक्यात एन्ट्री!” असं कॅप्शन या पोस्टला झी मराठीने दिलं आहे. मात्र, यामध्ये चिन्मय मांडलेकरचा पूर्ण चेहरा अद्याप रिव्हिल करण्यात आलेला नाही.
पण, या व्हिडीओमध्ये त्याची लहानशी झलक पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांनी आपल्या लाडक्या सत्यजितला अगदी अचूक ओळखलं आहे. या व्हिडीओमध्ये चिन्मय मांडलेकर एकदम डॅशिंग लूकमध्ये एन्ट्री घेताना दिसत आहे.
View this post on Instagram
तो ‘सनई चौघडे’ मालिकेत पुन्हा एकदा सत्यजित ही भूमिका साकारणार आहे. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. चिन्मय मांडलेकरचं कमबॅक पाहून चाहत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. Zee Marathi Serial
सध्या या मालिकेत शर्वरी नव्या नोकरीच्या शोधात असल्याचं पाहायला मिळतं आहे. आता शर्वरीचा नवा बॉस सत्यजित असणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. Zee Marathi Serial
हेही वाचा:





