Shahid Kapoor : बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि क्रितीचा ‘तेरी बातों मैं उल्झा जिया’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. मात्र या चित्रपटात मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री स्नेहल शिदमने ‘तेरी बातों मैं उल्झा जिया’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे. स्नेहल तिच्या हटक्या कॉमेडीमुळे खास करून अधिक ओळखली जाते. परंतु आता तिने शाहिद आणि क्रितीसोबत काम केल्याचे सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
अभिनेत्री स्नेहल शिदमने शाहिद कपूरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. आहे. फोटोमधील दोघांचाही हा लूक चित्रपटातील दिसत आहे. स्नेहलने फोटो शेअर करत “कळवायला उशीर आणि आनंद दोन्हीही होतो. शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांचा नवा हिंदी चित्रपट “तेरी बातो में ऐसा उलझा जिया” नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात माझी एक छोटीशी भुमिका आहे. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा चित्रपट आणि कसा वाटतोय ते सांगा. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असच राहु द्या…” असं कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
स्नेहलनेच्या ह्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटटी आणि चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्रीने आपल्या सिनेकारकिर्दित ‘चला हवा येऊ द्या’, ‘देवमाणूस २’, ‘माझा होशील ना’, ‘भागो मोहन प्यारे’ सारख्या मालिकेंमध्ये आणि ‘बॉईज ३’ चित्रपटातही पाहायला मिळाली. ‘तेरी बातों मध्ये उलझा जिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साहने केले आहे. यात शाहिद कपूर आणि क्रिती सेननची लव्हस्टोरी चित्रपटामध्ये दाखवली आहे.