Marathi Bigg Boss : मराठी ‘बिग बॉस’ गाजवल्यानंतर अभिनेत्री झळकणार थेट पंजाबी इंडस्ट्रीत; स्वतः दिली अपडेट !

Nikki Tamboli – ‘बिग बॉस 14’, ‘खतरों के खिलाडी 11’ आणि नुकतंच कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’च्या पाचव्या सीझनमध्ये जोरदार चर्चेत राहणारी अभिनेत्री ‘निक्की तांबोळी’ आता लवकरच पंजाबी इंडस्ट्रीत झळकणार आहे. निक्की तांबोळी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बिग बॉसच्या घरामध्ये निक्की तांबोळीनं आपल्या तुफान अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली होती.
अभिनेत्री सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव असल्याचं नेहमी दिसून येत. निक्कीला इन्स्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करत असतात. निक्की तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ तिच्या फॉलोअर्ससाठी नेहमी शेअर करत असून, ती चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवत आहे.
निक्की तांबोळीने मराठी बिग बॉसचं पाचवं पर्व चांगलंच गाजवलं. मात्र, महाअंतिम फेरीत ती एलिमिनेट झाली. अशातच आता निक्की पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. लवकरच ‘बदनाम’ चित्रपटातील आयटम साँगमध्ये अभिनेत्री दिसणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच फेब्रुवारी 2025 प्रदर्शित होणार आहे.
पंजाबी इंडस्ट्रीतील पदार्पणाबद्दल निक्की म्हणाली की, ‘बदनाम’चा एक भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हे एक गाणं आहे जे तुम्हाला उठून नाचण्यास भाग पाडेल आणि या अप्रतिम टीमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे.’
गाण्यावर काम करतानाचा अनुभव सांगताना निक्की तांबोळी म्हणाली, ‘मला आशा आहे की, माझ्या चाहत्यांना हे गाणं आवडेल जेवढं मला या गाण्यात काम करताना आवडलं आहे.’ सुनिधी चौहानने या गाण्याला तिचा आवाज दिला आहे. असं देखील अभिनेत्रीने सांगितलं आहे.





