निक्की तांबोळीच्या डोळ्याला दुखापत; रुग्णालयाबाहेरील व्हिडिओ व्हायरल

Nikki Tamboli Eye Injury | ‘बिग बॉस मराठी 5’ची स्पर्धक निक्की तांबोळीला मोठी लोकप्रियता मिळाली. या शोनंतर ती टीव्ही शोमध्ये पाहायला मिळाली. मात्र सध्या निक्की एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिचा रुग्णालयातून बाहेर येतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी तिच्यासोबत बॉयफ्रेंड अरबाज पटेल देखील पाहायला मिळाला.
व्हायरल व्हिडीओमध्ये निक्कीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झालेली दिसून येत आहे. तिच्या डोळ्याला पांढऱ्या रंगाची पट्टी बांधलेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये अरबाज निक्कीची काळजी घेताना दिसत आहे. त्यानंतर दोघे एकत्र कारमध्ये बसून जातात, यावेळी निक्की खूपच अस्वस्थ वाटली. तिच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, तिच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट्स करत आहे. तसेच ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
View this post on Instagram
निक्कीच्या तब्येतीबाबत चाहत्यांची चिंता पाहून अखेर तिचा बॉयफ्रेंड अरबाज पटेलने मौन सोडलं आहे. अरबाजने एका मुलाखतीत सांगितले की, “निक्कीच्या डोळ्याला एक लहानशी दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तिला छोटी सर्जरी करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, काही दिवस तिला काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच ही पट्टी लावण्यात आली आहे. तिची प्रकृती आता स्थिर असून काळजी करण्यासारखे काहीही नाही.” Nikki Tamboli Eye Injury |
दरम्यान, निक्की कायम आपल्या लूक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अरबाजसोबतचे व्हिडीओ शेअर करते. बिग बॉसनंतर निक्की तांबोळी हिंदी शो ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ आणि मराठी कार्यक्रम ‘शिट्टी वाजली रे’ मध्ये दिसली. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची ओळख बिग बॉसच्या घरात असताना झाली. शोमध्ये त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपातंर प्रेमात झाले. Nikki Tamboli Eye Injury |
हेही वाचा:




