Nikki Tamboli : बिग बॅास फेम निक्की तांबोळीला डेंग्यूची लागण; पोस्टद्वारे दिली माहिती

Nikki Tamboli : बिग बॅास फेम अभिनेत्री निक्की तांबोळी हिला डेंग्यूची लागण झाली आहे. तिने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
बिग बॉस १४ मधून अभिनेत्री निक्की तांबोळी हिने मोठी प्रसिद्धी मिळवलेली. मात्र, तिने आपल्याला डेंग्यूची लागण झाल्याची माहिती दिली. निक्की तांबोळीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्टोरी रविवारी शेअर केली आहे. या स्टोरीतून तिने डेंग्यूची लागण झाल्याचं तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे.
नुकतीच निक्कीने तिला १०३.६ अंशांचा ताप असल्याचं सांगितलं आहे. तिने गणेश चतुर्थी सोहळ्याला उपस्थित राहू न शकल्याबद्दल दुःख व्यक्त केलं होतं. याबाबत तिने “गणपती बाप्पा, कृपया मला लवकर बरे करा. मला तुमचे दर्शन घेण्यासाठी यायचे आहे.” असं पोस्टमध्ये तिने म्हटलं होतं.
View this post on Instagram
निक्की तांबोळी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. बिग बॉस १४ या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धेक म्हणून ती सहभागी झाली होती. ती या शोमध्ये दुसरी रनर-अप ठरली होती. याशिवाय, अभिनेत्री ‘कंचना ३’ सारख्या दाक्षिणात्य सिनेमांमध्येही दिसली. अनेक संगीत व्हिडिओंमध्येही ती दिसली आहे. तसेच निक्की ‘खतरों के खिलाडी 11’, ‘द खतरों के खिलाडी शो’, ‘बिग बॉस मराठी सीझन 5’ आणि ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया’ यांसारख्या स्टंटवर आधारित रिॲलिटी शोमध्ये देखील सहभागी झाली होती.
हेही वाचा : Punjab Flood | पंजाबला पुराचा तडाखा; अनेक गावे पाण्याखाली, शेतीचे मोठे नुकसान




