Nigeria Tanker Blast | नायजेरियात महिन्याभरात दुसऱ्यांदा टँकर स्फोटाची घटना; 18 जणांचा मृत्यू

Nigeria Tanker Blast | नायजेरियाच्या दक्षिण-पूर्वे राज्यातील एनुगु-ओनित्शा एक्सप्रेसवेवर इंधनाच्या टँकरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले आहेत. नॅशनल रोड सेफ्टी एजन्सीचे प्रवक्ते ओलुसेगुन ओगुंगबेमिडे यांनी सांगितले की, टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि एक्स्प्रेस वेवर टँकरने 17 वाहनांना धडक दिली. त्यानंतर हा स्फोट झाला.
या घटनेनंतर १० जणांना रुग्णालयात पाठवण्यात आले असून तीन जण सुरक्षित आहेत. 18 जण अशा प्रकारे भाजले आहेत की त्यांना ओळखणेही कठीण झाले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला नायजेरियामध्ये एका गॅस टँकरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेमध्ये किमान 70 जण ठार झाले आहेत.
महिनाभरात दुसरी घटना
दुर्घटनाग्रस्त झालेल्या गॅसोलाईन टँकरमधून जनरेटच्या मदतीने गॅसोलाईन इंधन दुसऱ्या टँकरमध्ये हलवण्यात येत होते. त्यादरम्यान हा स्फोट झाला. या स्फोटाच्यावेळी टँकर जवळ अनेक लोक जमा झाले होते. तसेच गॅसोलाईन दुसऱ्या टँकरमध्ये हलवणारे अनेक कर्मचारी देखील होते. हे सर्वजण या गंभीर स्फोटात मरण पावले, असे राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेचे हुसैनी इसाह यांनी सांगितले होते. Nigeria Tanker Blast |
आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या नायजेरियातील बहुतेक प्रमुख रस्त्यांवर मालवाहतूक करण्यासाठी कार्यक्षम रेल्वे व्यवस्था नसल्यामुळे ट्रक अपघात होणे ही नेहमीची गोष्ट झाली आहे. मात्र यात लोकांना आपला जीव गमावावा लागत असल्याने वाहतूक नियम कडक करण्याची मागणी अनेक जण करत आहेत. Nigeria Tanker Blast |
हेही वाचा:





