पुणे : दाजीने केले अल्पवयीन मेव्हणीचे अपहरण

पुणे – दाजीने अल्पवयीन मेव्हणीचे अपहरण केल्याची घटना सिंहगड येथे घडली. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात अरुण संजय काळे (24,रा.केडगाव, दौंड) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी 50 वर्षीय महिला हिंगणे खुर्द येथे रहाते. तीचा भाजीविक्रीचा व्यवसाय असून ती तीच्या तीन अल्पवयीन मुलींसह तेथे घराते. तीच्या मोठ्या मुलीचा विवाह अरुण काळे बरोबर झाला आहे. सोमवारी पहाटे ती तीघा मुलींना घरात ठेऊन, घराला बाहेरुन कुलूप लावून मार्केटयार्ड येथे भाजी खरेदी करण्यास गेली होती.
यावेळी तीचा जावई अरुण हा घरी आला होता. त्याच्याकडे घराची एक चावी असते. त्याने घराचे कुलूप उघडून 17 वर्षाच्या मेव्हणीला पळवून नेले. फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी अरुण हा ऊसतोडणी कामगार म्हणून काम करतो. त्याच्याकडे मोबाईल नसल्याने तपासात अडथळे येत आहेत. तर फिर्यादीही घटनेनंतर भाड्याचे घर सोडून निघून गेली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे करत आहेत.





