BIG NEWS : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : ‘ते’ दोन्हीही खासगी दावे न्यायालयाने फेटाळले
Updated On:

पुणे – टिकटॉक स्टार पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी लष्कर न्यायालयात दाखल करण्यात आलेले दोन्ही खासगी दावे न्यायालयाने फेटाळले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी पाटील यांनी याबाबत आदेश दिला. फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग हे गुन्हा दाखल करण्यासाठी सक्षम पुरावे नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
या प्रकरणाची वानवडी पोलिसांनी चौकशी करावी. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या खटल्यांत करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीच्या अध्यक्षा ऍड. ईशाना जोशी आणि लीगल जस्टिस सोसायटीतर्फे ऍड. भक्ती पांढरे यांनी खटला दाखल करण्यासाठी अर्ज केले होते.





