iQOO 11 5G First Look Out: भारतात लाॅंच झाला जबरदस्त मोबाईल, पाहा फिचर्स

iQOO 11 5G स्मार्टफोन आज (दि. 11) भारतात लाॅंच झाला आहे. फोनचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फोन सोबत मिळणारा Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर. नवीन iQOO 11स्मार्टफोन या प्रोसेसरसह लाॅंच झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये सर्वोत्तम सुविधा दिल्या असून आईक्यू 11 मध्ये पाॅवरफुल फीचर्ससुद्धा दिलेले आहेत.
आईक्यू 11मध्ये 144 हर्ट्ज़ रिफ्रेश रेटसह 2K डिस्प्ले, 16GB रैम मिळत असून भारतातील उपलब्ध फोनपैकी हा सर्वात पॉवरफुल फोन मानला जात आहे. iQOO 11 ला लवकरच लाॅंच होणारे OnePlus 11 और Xiaomi 13 हे फोन टक्कर देऊ शकतील. फोटोंच्या माध्यमातून आईक्यू 11ची झलक प्रेक्षकांना दाखवण्यात आली आहे.
हा स्मार्टफोन iQOO प्रीमियम ग्लास मटीरियल पासून निर्मित असून ग्लास डिझाईनसह येत आहे. आईक्यू 11 5जी मध्ये 6.78 इंच 1440p E6 AMOLED डिस्प्ले दिलेला आहे. तसेच स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर, 16 जीबी रॅम व 256 जीबी इनबिल्ट स्टोरेज असून हे स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येणार नाही. iQOO 11 Android 13 बेस्ड Funtouch OS 13 बरोबर येतो 5000mAh बॅटरी बेरोबर 120W फास्ट वायर्ड चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.
कॅमेरा-
iQOO 11 मध्ये ट्रिपल रियर कॅमरा सेटअप दिलेला आहे. 50 मेगापिक्सल प्राइमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड आणि 13 मेगापिक्सल तीन सेंसर दिलेले सेल्फी, वीडियो कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सल फ्रंन्ट कैमरा आहे. iQOOने iQOO 11 5G को रॅम ऑप्शनसह लाँच झाला आहे. 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज वेरियंट असलेल्या स्मार्टफोनची किंमत 59,999 रुपये आहे. तर, 16 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज वेरियंट असलेल्या स्मार्टफोनची किंमत 64,999 रुपये असणार आहे..





