नाकात नोझ रिंग.. हातात सिगारेट..; पेड्डीचा धमाकेदार टीझर रिलीज, राम चरणचा लूक पुष्पाला टक्कर देणार?

Peddy Movie | Rana Charan | रामनवमीच्या शूभमूहर्तावर मैत्री मुव्हीजने प्रेक्षकांना खास सरप्राईज दिले आहे. दाक्षिणात्य अभिनेता गोबलस्टार राम चरणचा बहुप्रतिक्षित ‘पेड्डी’ चित्रपटाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट राम चरणच्या करिअरमधील 16 वा चित्रपट आहे, जो राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरमधून राम चरणचा लूक समोर आला होता. आता पेड्डीचा पहिला टीझर प्रदर्शित झाला असून अल्पावधीच या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
‘पेड्डी’ हा चित्रपट एक स्पोर्ट्स ॲक्शन ड्रामा चित्रपट असणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये राम चरणच्या लूकची चर्चा केली जात आहे. राम चरणचे पात्र क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवते. खांद्यावर बॅट घेऊन, सिगारेट ओढत आणि जमावाच्या टाळ्यांच्या कडकडाटात त्याची शानदार एन्ट्री होते. यानंतर तो आपला वेग आणि सामर्थ्य याच्या जोरावर विस्तीर्ण असेललं शेतं पार करतो. टीझरच्या शेवटी, राम चरणचे पात्र मैदानात पोहोचताच त्याची हातातली बॅटने बॅालला मारलेला शॅाट सगळ्यांचे लक्ष वेधून घेणार आहे.
या चित्रपटातील राम चरणच्या लूकची चर्चा होत आहे. लांब विस्कटलेले केस, दाट दाढी आणि नाकात असलेली नोझ रिंग असलेला त्याचा खतरनाक लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतराला आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरचीही महत्त्वाची भूमिका आहे. ‘देवारा’ नंतरचा हा त्याचा दुसरा तेलुगु चित्रपट असणार आहे. याशिवाय जगपती बाबू आणि ‘मिर्झापूर’ फेम दिव्येंदू देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.
राम चरणचे कम बॅक
या चित्रपटाला अॅाक्सर विजेते संगीतकार ए आर रहमान यांनी संगीत दिले आहे. त्यामुळे या चित्रपटाची भव्यता प्रचंड वाढलेली दिसते. मैत्री मुव्हीज मेकर्स आणि सुकुमार लिखित पेड्डीचा दमदार टीझर प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. यापूर्वी राम चरण ‘गेम चेंजर’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल करू शकला नाही. यामुळे पेड्डीतून राम चरण पुन्हा एकदा कम बॅक करणार आहे.





