जय श्रीराम…! बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाची पहिली झलक भेटीला; रणबीर राम, साई पल्लवी सीता, रावणाच्या भूमिकेत ‘हा’ अभिनेता

Ramayana Movie First Look : दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा बहुचर्चित रामायण या चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडीओ समोर आला आहे. ३ मिनिटांच्या या फर्स्ट लूकमध्ये चित्रपटातील कास्टची ओळख करून देण्यात आली आहे. सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होत आहे. चाहत्यांकडून चित्रपटाच्या पहिल्या झलकचे कौतुक केले जात आहे.
या व्हिडीओमध्ये अभिनेता रणबीर कपूर भगवान राम, तर साई पल्लवी माता सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहेत. यामुळे या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या पहिल्या झलकमध्ये रामायणचा ओरा काय असू शकतो याचा अंदाज लावता येऊ शकतो. संपूर्ण व्हिडीओमध्ये ग्राफिक्सचा सुंदर वापर करण्यात आला आहे. अप्रतिम व्हिज्युअल इफेक्ट्सने विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram
या चित्रपटात अभिनेता सनी देओल हनुमानच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची ही पहिली झलक समोर येताच, चाहत्यांनी सोशल मीडियावर #JaiShriRam हा हॅशटॅग ट्रेंड सुरू केला आहे. नुकतच रामायण – पार्ट 1 चे शूटिंग पूर्ण झाले आहे. दरम्यान, आता प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यामुळे प्रेक्षक चित्रपट रिलीजसाठी आतुर झाले आहे. दिवाळी २०२६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेक्षकांमध्ये आत्तापासून चित्रपटाची हाईप तयार करण्याच्या उद्देशाने पहिली झलक समोर आणण्यात आली आहे.
हेही वाचा : बिहारमध्ये ‘आप’ स्वबळावरच! ; “आता कोणाशीही युती नाही” म्हणत केजरीवालांची घोषणा





