E-Summit Pune 2026: विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) च्या आंत्रप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेलतर्फे (VEDC) ‘ई-समिट पुणे २०२६’ या आठवडाभर चालणाऱ्या भव्य उद्योजकता महोत्सवाला सोमवारी (दि. १७ मार्च) सुरुवात झाली. नवकल्पना, उद्योजकता आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारा हा समिट २४ मार्चपर्यंत चालणार आहे. समिटचे उद्घाटन ‘स्टार्टअप शोकेस’ या कार्यक्रमाने झाले. पुणे एंजल नेटवर्कचे सीईओ आणि फाउंडर राहुल जैन, तसेच संस्थेचे प्राध्यापक गजानन गांभिरे व राजेश ढाके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या व्यासपीठावर नवउद्योजकांनी त्यांच्या स्टार्टअप कल्पना आणि प्रकल्प सादर केले. व्यवसाय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भविष्यातील संधींची झलक यातून पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांसाठी खास स्पर्धा – विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती आणि व्यावसायिक कौशल्यांना वाव देण्यासाठी ‘पिच परफेक्ट’ आणि ‘बोर्डरूम’ या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना मांडण्याची आणि स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार आहे. २३ मार्च रोजी ‘ई-टॉक्स’ सत्र समिटमधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे २३ मार्च रोजी होणारे ‘ई-टॉक्स’ हे खास संवाद सत्र. यात तीन मान्यवर वक्ते विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. संजय कटकर — क्विक हील टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक अभिजीत अंधारे — ट्रायडंट गेमिंगचे संस्थापक (गेमिंग विश्वात ‘घातक’ या नावाने प्रसिद्ध) खालिद वानी — वन कॅपिटल लिमिटेडचे संस्थापक आणि बोर्ड सदस्य याशिवाय शुभंकर सलील कुलकर्णी आणि त्यांच्या ‘टेल ऑफ मेलोडीज’ बँडची विशेष संगीत सादरीकरणही या सत्रात होणार आहे. ‘समिट शोडाउन’ने होणार समारोप – समिटचा समारोप २४ मार्च रोजी ‘समिट शोडाउन’ या धमाकेदार कार्यक्रमाने होणार आहे. अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर दीशा कटकर तसेच सौरभ भोसले यांची विशेष उपस्थिती असेल. लाइव्ह बँड परफॉर्मन्समुळे हा समारोप संस्मरणीय ठरणार आहे. विद्यार्थी, नवसंशोधक आणि उद्योजक बनण्याची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ‘ई-समिट पुणे २०२६’ हे शिकण्याचे, स्पर्धा करण्याचे आणि प्रेरणा घेण्याचे उत्तम व्यासपीठ ठरणार आहे.