लघुउद्योजकांचा डिजिटल पेमेंटचा वापर वाढला

नवी दिल्ली – छोट्या व्यवसायांना डिजिटल पेमेंट करता यावे याकरिता ऍमेझॉन कंपनीने डिजीटल पेमेंट यंत्रणा उपलब्ध केली असून याचा उपयोग देशातील 50 लाख लघु आणि मध्यम व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते.
लघुउद्योगांना आगामी काळात डिजिटल पेमेंट करताना फारसे अडथळे येणार नाहीत. डिजिटल पेमेंट करण्यासाठी ऍमेझॉन पे लघुउद्योजकांना आवश्यक ती तांत्रिक मदत करीत आहे. याबाबत ऍमेझॉन पे इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र नेरूरकर यांनी सांगितले की, लघु आणि मध्यम व्यवसाय हे आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. 50 लाखांपेक्षा जास्त लघु व्यवसाय मालक आणि उद्योजकांना डिजीटल पेमेंट स्वीकारण्यास सक्षम करून, आम्ही त्यांचा डिजीटल इंडियामधील सहभाग वेगवान केला.
ऍमेझॉन पे फॉर बिजनेस ऍप पुढे हे पेमेंट स्वीकारण्यास सहायक ठरेल. आम्ही छोट्या व मध्यम उद्योगासाठी आमची डिजीटल पेमेंट स्वीकृती यूपीआयच्या वापराने उभारली. यामुळे भारताचा पैसे भरण्याचा मार्ग बदलेल.





