Aluminum And Steel Tariffs: अमेरिकेने भारतीय वस्तूवर 50 ऐवजी 18% आयात शुल्क लावण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केलेला आहे. याचा तपशील अजून गुलदस्त्यात आहे. मात्र अमेरिका भारतीय अल्युमिनियम, पोलाद, लोखंड इत्यादी वस्तूवर पूर्वीप्रमाणे 50 टक्के आयात शुल्क लावणार असल्याचे स्पष्टीकरण या उद्योगाने केले आहे. या उद्योगाच्या उत्पादनावर अमेरिकेत गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापासून 50 टक्के आयात शुल्काची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे या क्षेत्रातून अमेरिकेला होत असलेले निर्यात कमी झाली आहे. या उद्योगाच्या संघटनेने सांगितले की इतर वस्तूवरील आयात शुल्क अमेरिका कमी करणार असली तरी अॅल्युमिनियम उद्योगावरील कपात होणार नाही. Gold Silver Price Hike: सोने-चांदीच्या पुन्हा सुसाट! तीन दिवसांच्या घसरणीनंतर किमतीत मोठी वाढ अॅल्युमिनियम उद्योगावरील शुल्क कायम – अॅल्युमिनियम उत्पादकाच्या संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र चोप्रा यांनी सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यकारी आदेश काढून इतर क्षेत्रावर पन्नास टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. मात्र अॅल्युमिनियम उद्योगावर आयात शुल्क लावताना अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाने अमेरिकेतील व्यापार कायद्यातील 232 कलमांतर्गत 50 टक्के आयात शुल्क लावले होते. त्यामुळे ट्रम्प यांची कार्यकारी आदेश जरी रद्द झाला तरी नव्या कायद्याअंतर्गत अॅल्युमिनियम उद्योगावर असलेले शुल्क आगामी काळातही चालू राहण्याची शक्यता आहे. अॅल्युमिनियम उद्योगातील उद्योजकांनी सांगितले की भारत सरकारने अॅल्युमिनियम, लोखंड आणि पोलादावरील आयात शुल्क 18% करण्याबाबत अमेरिकन प्रशासनाकडे आग्रह धरण्याची गरज आहे. जेव्हा या व्यापाराचा कराराचा मसुदा होईल त्यामध्ये या बाबी समाविष्ट करण्याची गरज आहे. अन्यथा या बाबी करारापासून दूर राहू शकतील आणि या उद्योगावरील नकारात्मक परिणाम कायम राहण्याची शक्यता आहे. India-US Trade Deal: ट्रम्प यांनी टॅरिफ का कमी केले? भारत सरकारने उघड केले गुपित