India-US Trade Deal: अमेरिका आणि भारत यांच्यात नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक व्यापार करारावरून देशात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील आयात शुल्कात (टॅरिफ) मोठी कपात का केली आणि त्याबदल्यात भारताने काय दिले, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात असतानाच, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी यामागचे गुपित उघड केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असलेल्या आपल्या वैयक्तिक मैत्रीचा वापर करून देशाच्या हितासाठी हा अत्यंत फायदेशीर करार केल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. piyush goyal हा करार शेजारील देशांच्या तुलनेत सर्वोत्तम – मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पियूष गोयल यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी अंतिम केलेला हा करार शेजारील देशांच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. वर्षानुवर्षे अधिकारी आणि मंत्र्यांच्या पातळीवर रखडलेली बोलणी कोणताही निष्कर्ष काढू शकली नव्हती, मात्र पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेत ट्रम्प यांच्याशी संवाद साधला आणि थेट तोडगा काढला. Gold Silver Price Hike: सोने-चांदी पुन्हा सुसाट! तीन दिवसांच्या घसरणीनंतर किमतीत मोठी वाढ अमेरिकेने आधी लादलेले ५० टक्के शुल्क आता १८ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, ज्यामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः कापड, चामड्याच्या वस्तू, समुद्री खाद्य आणि दागदागिने यांसारख्या श्रम-केंद्रित क्षेत्रांना याचा प्रचंड फायदा होईल, ज्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत. या कराराच्या अटींनुसार, भारताने रशियाकडून तेल खरेदी न करण्याचा आणि त्याऐवजी अमेरिका किंवा व्हेनेझुएला यांसारख्या देशांकडून ऊर्जा गरजा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदल्यात अमेरिकेने भारतीय वस्तूंसाठी आपली बाजारपेठ खुली केली आहे. राहुल गांधींवर जोरदार निशाणा – गोयल यांनी या मुद्द्यावरून विरोधकांवर, विशेषतः राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधींसारखे नकारात्मक विचार असलेले नेते देशाची दिशाभूल करत असून, त्यांना देशाच्या प्रगतीची अजिबात काळजी नसल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत झाली होती, मात्र मोदी सरकारने तिला बळकट केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. हा करार केवळ व्यापार वृद्धीसाठी नसून भारतीय शेतकरी, दुग्ध व्यावसायिक आणि मच्छिमारांच्या हितांचे रक्षण करणारा आहे. ट्रम्प प्रशासनाने वाढवलेल्या शुल्कामुळे भारतीय सागरी खाद्य आणि अभियांत्रिकी मालावर विपरित परिणाम होत होता, तो आता या करारामुळे थांबणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे या कराराची घोषणा करताना मोदींशी असलेल्या घनिष्ठ संबंधांचा उल्लेख केला होता, ज्याचा पुनरुच्चार गोयल यांनी करून हा करार भारतासाठी एक मोठा राजनैतिक विजय असल्याचे अधोरेखित केले. Rahul Gandhi: लोकसभेत राहुल गांधींनी पुन्हा उचलला चीनचा मुद्दा; केंद्रीय मंत्र्यांचे प्रत्युत्तर, गदारोळानंतर कामकाज स्थगित