\n

आई म्हणजे अरुंधती हे मध्यवर्ती पात्र, त्या अनुषंगाने येणारी कथानकातील पात्रं, अरुंधतीचे या प्रत्येक पात्राशी असलेलं नातं आणि विशेषतः त्या नात्यांची वीण इतकी छान उलगडलेली आहे की ती सारी पात्रं आपल्या घरातलीच असल्यासारखी वाटतात.

\n

यातलं एक नातं, जे माझं फार आवडतं आहे, ‘अरुंधती आणि यश बाळातील’ माय – लेकराचं गोड नातं माझ्या शब्दांतून उलगडण्याचा प्रयत्न करेनच पण आज लिखाणाचा मुख्य विषय आहे –
\nयश म्हणजे आपला अभिषेक देखमुख चेहऱ्यावर प्रसन्न हसू आणि बोलका (expressive) fresh चेहरा घेऊन यश हे पात्र आपल्यासमोर येतं!

\n
\n
\n

 

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

 

\n

A post shared by Abhishek Deshmukh (@abhisheksdeshmukh)

\n
\n
\n

\n

या पात्राला विविध छटा आहेत. आईवर अमाप प्रेम नव्हे निस्सीम भक्ती असलेलं यश बाळ इवल्याशा कोकरागत जेव्हा आईच्या कुशीत शिरतं तेव्हा मला नेहमी वाटतं की आपल्याला असं लहान बाळ होऊन आईच्या कुशीत शिरता यायला हवं! याला सदासर्वदा आई सोबत लागते, सल्ला द्यायला, लाड करून घ्यायला तरीही हा अतिलाडाने बिघडलेला typical ‘बबड्या’ नाहीये!

\n

सरधोपट मार्गाने न जाता करिअरची नवीन वाट धुंडाळणारा आणि त्यासाठी बाबांचा रोष ओढवून घेणारा यश मला आवडतो. त्या वयातील बंडखोर वृत्ती मग ती कलाक्षेत्रात करिअर करणं असो, बाबांना उलट उत्तरं करणं असो वा गौरीवर प्रेम करणं असो आपल्याला सारंच भावतं आणि त्या वयात आपणही थोडेफार असेच होतो याची सुखद आठवण होते.

\n
\n
\n

 

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

 

\n

A post shared by Abhishek Deshmukh (@abhisheksdeshmukh)

\n
\n
\n

\n

आईकडून लाड करून घेणारं हे यश बाळ आईवर जीवापाड प्रेम तर करतंच पण त्याहीपेक्षा संकटात आईच्या मागे खंबीरपणे उभं राहतं. लहानपणी आईने आपल्या हाताला धरून शिकवलंय याची जाण ठेऊन यश आपल्या आईला technology शिकवतो. तिला गाणं पुनःश्च सुरु करण्यासाठी आणि आत्मनिर्भर होण्यासाठी प्रवृत्त करतो. त्याला आईचा ‘सखा’ होणं जमलंय आणि अभिषेकने स्क्रीनवर ते छान portray केलंय त्यामुळेत्याचं विशेष कौतुक वाटतं.

\n

यशचं भावंडांसोबत मजा मस्ती करणं, अगदी मारामारी करणं आपल्याला आपल्या भावंडांची आणि त्या ‘बालपणीचा काळ सुखाचा’ type सुखद क्षणांची आठवण करून देतं. विशेषतः अभि आणि यश मधलं दोन भावांमधलं समंजस नातं तर ईशा आणि यश यांच्यातलं अल्लड तरी प्रेमाने अन काळजीने ओतप्रोत भरलेलं नातं भावतं!

\n
\n
\n

 

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

 

\n

A post shared by Abhishek Deshmukh (@abhisheksdeshmukh)

\n
\n
\n

\n

आपल्या आजोबांशीही या पठ्ठ्याचं ‘गब्बर’ हाक मारण्याइतपत खेळकर नातं आहे. गौरीशी अलवार उमलणारं प्रेमाचं नातं ही पाहायला फार गोड वाटतं.

\n

यशचे या साऱ्यांशी असलेल्या नात्यांचे बंध मनाचा ठाव घेतात आणि म्हणूनच ती सारी माणसं आपलीशी वाटतात. समस्त मध्यमवर्गीय मराठी घरातली मुलं यश मध्ये स्वतःला पाहतात.
\nमला विशेष उल्लेख करावासा वाटतो तो – आपल्या बाबांचे संजना आंटीशी असलेले अनैतिक संबंध समजल्यावर समूळ हादरलेला यश – त्यावेळेचा त्याचा अभिनय – लाजवाब, चटकन आपल्याही डोळ्यांत पाणी आणलं त्याने!

\n

आणि यानंतर mature झालेला यश, आईला जीवापाड जपणारा यश, घर एकसंध रहावं म्हणून धडपडणारा यश ही स्थित्यंतरं अभिषेकने त्याच्या अभिनयाच्या ताकदीने उत्तम रंगवली आहेत.
\nमी बऱ्याच वेळेस एखादं male character follow करतो ते त्याच्या costume च्या choice वरून, first impression म्हणा हवंतर! यशच्या acting आधी मी त्याच्या wardrobe च्या प्रेमात मी पडलो. त्याच्या चेहऱ्यासारखे त्याचे t-shirts ही बोलतात, रंगसंगती, designs आणि fitting ही – सारंच outstanding!

\n
\n
\n

 

\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
View this post on Instagram
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n
\n

 

\n

A post shared by Abhishek Deshmukh (@abhisheksdeshmukh)

\n
\n
\n

\n

कुर्ते तर काय भन्नाटच, आणि या राजबिंड्या अभिषेकला ते शोभूनही दिसतात! Mangesh Adhikari मला असे outfits शोधण्यात मदत करणार आहेच! शिक्षणाने architect असलेल्या अभिषेकने यश हे पात्र एखाद्या सुंदर दौलदार इमारतीसारखं उभं केलंय!

\n

हा प्रणिमित्र मध्ये ‘My Friend Pawsome’ ही web series ही चालवत होता, माझ्यासारख्या बऱ्याच त्याच्या चाहत्यांनी आणि pet lovers नी ती series enjoy केली होती.
\nसाध्या शब्दांत काळजाला हात घालणारा हा मनस्वी मुलगा ‘लंबी रेस का घोडा’ आहे असं आतातरी नक्कीच दिसतंय!! गिटार तो स्वतःही म्हणतच असेल –
\n‘पापा कहते हैं बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा!!’
\nआणि हे तो निश्चित करू जाणे!!

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"#HBD खोडकर, खट्याळ अभिषेक…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/12/abhishek.gif","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/news-about-abhishek-deshmukh-birthday#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/12/abhishek.gif","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/news-about-abhishek-deshmukh-birthday#webpage","name":"#HBD खोडकर, खट्याळ अभिषेक…","url":"https://www.dainikprabhat.com/news-about-abhishek-deshmukh-birthday","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/news-about-abhishek-deshmukh-birthday#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2020/12/abhishek.gif","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/news-about-abhishek-deshmukh-birthday#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/news-about-abhishek-deshmukh-birthday","name":"#HBD खोडकर, खट्याळ अभिषेक…"}}]}}}

#HBD खोडकर, खट्याळ अभिषेक…