Rupali Bhosle: सलमान खानच्या हिंदी ‘बिग बॉस’मध्ये झळकणार ‘रूपाली भोसले’? स्पर्धकांची नावे आली समोर, वाचा….

Rupali Bhosle । Bigg Boss – छोट्या पडद्यावरील “आई कुठे काय करते’ या मालिकेतील संजना अर्थातच अभिनेत्री रूपाली भोसले सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला सध्या मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
अभिनेत्री रुपाली भोसले या मालिकेतून पुन्हा एकदा घराघरात पोहचली असून, तिचा मोठा चाहता निर्माण झाला आहे. इंस्टाग्रामवर देखील अभिनेत्रीचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स असून, फॅन्स तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला पसंती देत असतात.
अश्यातच, अभिनेत्री संदर्भात एक बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेल्या या वादग्रस्त व बहुचर्चित ‘बिग बॉस’च्या 18व्या पर्वात रुपाली भोसले झळकणार असल्याचं बोललं जात आहे.
तसंच यापर्वातील काही निश्चित झालेल्या स्पर्धकांची नावं देखील समोर आली आहेत. प्रसिद्ध युट्यूबर मिथिलेश पटनाकर, आकृति नेगी, जसवंत बोपन्ना, दिग्विजय राठी, सीवेट तोमर, शाइनी आहुजा,
पायल मलिक, कृतिका मलिक, अर्जुन बिजलानी, करण पटेल, समीरा रेड्डी, सुरभि ज्योति, पूजा शर्मा, शोएब इब्राहिम, दलजीत कौर आणि इशा कोपिकर हे देखील यंदा बिग बॉसच्या घरात पाहायला मिळणार आहे.
अभिनेता सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून ‘बिग बॉस’च्या होस्टची धुरा सांभाळत आहे. होस्ट म्हणून देखील सलमान खान याला चाहत्यांनी डोक्यावर घेतला. आता ‘बिग बॉस 18’ मध्ये सलमान खान याच्यासोबत अब्दू रोजिक देखील शो होस्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे.





