Marathi Actress : ‘चाफा आणि तो…’; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने दिली प्रेमाची कबुली
Marathi Actress : छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्रीने चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे.

Marathi Actress : मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळींनी नव्या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. गायत्री दातार, रेवती लेले, ज्ञानदा रामतीर्थकर आणि विशाल निकम या कलाकरांनी आपल्या जोडीदारसोबतचे फोटो शेअर करत लगीनघाई सुरू झाल्याचे स्पष्ट केले.
यातच आता छोट्या पडद्यावरील आणखी एका अभिनेत्रीने चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे.
‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अभिनेत्री अपूर्वा गोरे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. सोशल मीडियावर होणाऱ्या पतीसह फोटो शेअर करत अपूर्वाने ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे. Marathi Actress
View this post on Instagram
हिरव्या रंगाची साडी, गळ्यात नाजूक ठुशी अन् हातात गुलाबाचं फूल घेऊन अपूर्वाने होणाऱ्या पतीसह हटके फोटोशूट केलं आहे. “ठरलं! चाफा आणि तो… मला खूप आवडतात…” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
मात्र, या फोटोंमध्ये अपूर्वाने तिच्या होणाऱ्या पतीचा फेस रिव्हिल केलेला नाही, त्याची ओळख तिने गुलदस्त्यात ठेवली आहे. अपूर्वा गोरेच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. Marathi Actress
दरम्यान, ‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा गोरेने ‘ईशा’ नावाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. जी अरुंधतीची धाकटी मुलगी दाखवण्यात आली होती.
तिने साकारलेली ईशाची भूमिका घराघरांत प्रचंड लोकप्रिय झाली होती. दरम्यान, तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, सध्या ती ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्यासह ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकात काम करत आहे. Marathi Actress
हेही वाचा:
Healthy Diet: हिवाळ्यात प्रोटीनसाठी आहारात घ्या या भाज्या, आरोग्याला मिळतील अनेक फायदे





