NZ Beat India : ग्लेन फिलिप्सच्या शतकी वादळात भारत गारद! ८७ धावांनी दारुणपराभव; डफीच्या ४ विकेट्सने मोडले कंबरडे
NZ Beat India : न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत अभेद्य आघाडी घेतल्यानंतर, भारताला ऑकलंड टी२० सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे न्यूझीलंडने मालिकेतील पहिला विजय नोंदवला.

New Zealand Beat India by 87 Runs 4th T20 Auckland Glenn Phillips Century : ग्लेन फिलिप्सचे शतक आणि मायकल ब्रेसवेलच्या वादळी खेळीनंतर जेकब डफीच्या अचूक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने अखेर भारताच्या विजयी रथाला रोखले. चौथ्या टी-२० सामन्यात किवी संघाने भारताचा तब्बल ८७ धावांनी दारुण पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ७ बाद २५९ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १७२ धावांत गारद झाला. मालिकेत ३-० ने पिछाडीवर असलेल्या यजमान संघाने या विजयासह आपले आव्हान राखले.
फिलिप्स-ब्रेसवेलचे वादळ; ४० चेंडूंत ११५ धावांची भागीदारी –
न्यूझीलंडच्या या ऐतिहासिक विजयाचा खरा शिल्पकार ठरला ग्लेन फिलिप्स. त्याने अवघ्या ४९ चेंडूंत ६ चौकार आणि १० उत्तुंग षटकारांसह १०७ धावांची तुफानी शतकी खेळी केली. त्याला मायकल ब्रेसवेलने अप्रतिम साथ देत अवघ्या २५ चेंडूंत ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ६५ धावा ठोकल्या. या दोघांनी अवघ्या ४० चेंडूंत ११५ धावांची भागीदारी रचून भारतीय गोलंदाजांची पळता भुई थोडी केली आणि भारताला सामन्यातून पूर्णपणे बाहेर फेकले.
भारतीय गोलंदाजांची धुलाई; २५९ धावांचा नवा विक्रम
New Zealand win by 87 runs in Auckland.
Our focus shifts to the 5th T20I in Hamilton on Sunday.
Scorecard ▶️ https://t.co/fx264c9iLe
#TeamIndia | #NZvIND https://t.co/mZccr7XMfl
— BCCI (@BCCI) October 30, 2026
या सामन्यात भारतीय गोलंदाजांची अत्यंत वाईट पद्धतीने धुलाई झाली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताने प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर धावा खर्च केल्या. अक्षर पटेलने ३ षटकांत ४३, नितीश कुमार रेड्डीने ४ षटकांत ५४, प्रिन्स यादवने ४९ तर मयंक यादवने ४८ धावा मोजल्या. केवळ अर्शदीप सिंगने ४ षटकांत ३८ धावा देऊन थोडाफार संयम राखला.
भारतीय फलंदाजांची निराशाजनक शरणागती –
Innings Break!
New Zealand post a total of 259/7 for India to chase.
Scorecard – https://t.co/fx264c9iLe #NZvIND https://t.co/GxwJ1GiBJx
— BCCI (@BCCI) October 30, 2026
प्रत्युत्तरात २६० धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची तगडी फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. पहिल्याच षटकात संजू सॅमसन (४) आणि पुनरागमन करणारा इशान किशन (०) बाद झाले. त्यानंतर अभिषेक शर्माने २७ आणि कर्णधार श्रेयस अय्यरने ११ चेंडूंत २२ धावा करत सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र पॉवरप्ले संपण्याआधीच दोघेही माघारी परतले.
जेकब डफीचा चौकार; तिलक वर्माची लढत अपुरी
मधल्या फळीत अक्षर पटेल (७), नितीश कुमार रेड्डी (२१) आणि नमन धीर (२८) ठराविक अंतराने बाद झाले. उपकर्णधार तिलक वर्माने एकट्याने खिंड लढवत सर्वाधिक ३५ धावा केल्या, परंतु त्याला दुसऱ्या टोकाकडून साथ लाभली नाही. न्यूझीलंडकडून जेकब डफीने अचूक मारा करत ४ षटकांत अवघ्या २३ धावा देत ४ महत्त्वाचे विकेट्स घेत भारताचा डाव १७२ धावांवर गुंडाळला.





