#NYOpen2020 : भारतीय टेनिसपटू दिविज शरण दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल
Updated On:

न्यूयाॅर्क : भारतीय टेनिसपटू दिविज शरण आणि त्याचा साथीदार न्यूझीलंडचा आर्टेम सिटाक या जोडीने न्यूयाॅर्क ओपन २०२० स्पर्धेच्या दुहेरीत अमेरिकेच्या आस्टिन क्राजिसेक आणि क्रोएशियाच्या फ्रैंको स्कुगोर या जोडीचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
https://twitter.com/NewYorkOpen/status/1227040846744293376?s=19
दुहेरीत शरण आणि सिटाक जोडीने पहिला सेट ७-६ तर दुसरा सेट ६-३ असा जिंकला. ही लढत जवळपास १ तास १९ मिनिटे चालली.





