पुणेकरांना मेट्रोची नव्या वर्षात भेट ; दोन्ही मार्गावर ६३ नवीन फेऱ्या

गर्दीच्या वेळी साडेसात मिनिटाला मेट्रो
पुणे : प्रवाशांंची वाढती संख्या आणि प्रवाशांच्या सोयीसाठी महामेट्रोकडून नव्या वर्षाच्या निमित्ताने प्रवासी सेवेचा विस्तार केला जाणार आहे. त्या अंतर्गत पुणे मेट्रोच्या गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लीनिक स्थानक आणि फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गावर नवीन ६३ फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी सकाळी आणि सायंकाळी आता पुणेकरांना प्रत्येक साडेसात मिनिटाला मेट्रो असणार आहे. तर रात्री प्रत्येक १० मिनिटांनी मेट्रो असणार आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयानी कामकाजासाठी मेट्रो मधील गर्दी कमी होण्यास याची मदत होणार आहे.
मेट्रोकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या आधी दिवसभरात मार्गिका १ (पिंपरी चिंचवड ते स्वारगेट ) वर ८१ फेऱ्या होत होत्या , तर १ जानेवारी २०२४ पासून ११३ फेऱ्या होणार आहेत आणि मार्गिका २ ( वनाज ते रामवाडी) वर ८० फेऱ्या होत होत्या, त्या १ जानेवारी पासून १११ फेऱ्या होणार आहेत. गर्दीच्या वेळात मार्गिका १ व २ वर ६ मेट्रो ट्रेन कार्यान्वयीत होत्या, तर आता १ व २ वर ८ मेट्रो ट्रेन कार्यान्वयीत होणार आहेत. तसेच कमी गर्दीच्या वेळात मार्गिका १ व २ वर ४ मेट्रो ट्रेन कार्यान्वयीत होत्या तर १ जानेवारी पासून मार्गिका १ व २ वर ६ मेट्रो ट्रेन कार्यान्वयीत होणार आहेत.
१ जानेवारी पासून अशा असतील फेऱ्या
दोन्ही मार्गिकांवर
सकाळी ६ ते सकाळी ८ पर्यंत : प्रत्येक १० मिनिटांनी
सकाळी ८ ते ११ पर्यंत : प्रत्येक ७.५ मिनिटांनी
सकाळी ११ ते दुपारी पर्यंत : प्रत्येक १० मिनिटांनी
दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत : प्रत्येक ७.५ मिनिटांनी
रात्री ८ ते रात्री १० पर्यंत : प्रत्येक १० मिनिटांनी
“१ जानेवारी २०२४ पासून होणाऱ्या प्रवासी सेवेच्या विस्तारामुळे मेट्रोच्या प्रवासी वेळेत जास्तीत जास्त लोकांना प्रवास करणे शक्य होणार आहे व वेळेची देखील बचत होणार आहे. सकाळी व संध्याकाळी ऑफिस जाण्याच्या़- येण्याच्या वेळेत होणारी गर्दी कमी होईल.”
श्रावण हर्डीकर ( महामेट्रो, व्यवस्था





