मलायकाच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील त्या तरुणाच नाव आलं समोर

Malaika Arora : बॅालिवूडची प्रसिद्ध आणि हॅाट अभिनेत्री मलायका अरोरा विविध कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा सोशल मीडियावर सतत वावर असून, ती आपल्या चाहत्यांसोबत सतत कनेट राहत असते. आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टीही मलायका सोशल मीडियावरून शेअर करत असते. अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकनंतर मलायकाच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
नुकताच मलायकाने तिचा ५२ वा वाढदिवस साजरा केला. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही मलायका फेटनेसच्या बाबतीत उत्तम आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या एनरिक इग्लेसियसच्या कॉन्सर्टला मलायकाने हजेरी लावली होती. या कॉन्सर्टमध्ये तिने पांढरा रंगाचा टँक टॉप आणि निळ्या रंगाची शॉर्ट वेअर केली होती. तिच्या या हॉट लूकने सर्वांचे लक्ष वेधले होते. या कॉन्सर्टमधील मलायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
दरम्यान, मलायकासोबत या कॉन्सर्टमध्ये एक तरुण देखील दिसला होता. आता मलायकासोबत व्हिडीओमध्ये तरुण कोण आहे याबाबत माहिती समोर आली आहे. व्हिडीओमध्ये मलायका या तरुणासोबत बोलत असल्याचे दिसत आहे. तर शो संपल्यानंतर दोघेही एकत्र बाहेर पडले. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मलायका सोबत दिसणाऱ्या तरुणाचे नाव हर्ष मेहता असून तो ३३ वर्षांचा आहे. सोशल मीडियावर दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू असून अद्यापर्यंत या चर्चांवर मलायकाने प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा : health tips: रिकाम्या पोटी केळी खाणं ठरू शकतं धोकादायक! जाणून घ्या केळी खाण्याची योग्य वेळ





