Shakira Hospitalized | लोकप्रिय कोलंबियन गायिका शकीराची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. ज्यामुळे शकीराला पेरूमधील तिचा कॉन्सर्टही रद्द करावा लागला. याबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
शकीराने तिच्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांने लिहिलं की, “मी रुग्णालयात दाखल आहे. मला पोटाशी संबंधित समस्या निमार्ण झाली आहे. डॉक्टरांनी मला परफॉर्म करण्यास मनाई केली आहे. मी स्टेजवर परफॉर्म करू शकत नाही. शो रद्द झाल्यामुळे मलाही वाईट वाटत आहे.” Shakira Hospitalized |
— Shakira (@shakira) February 16, 2025
पुढे शकीरा म्हणाली की, “मी स्वतः पेरूमध्ये चाहत्यांसाठी परफॉर्म करण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आज मी स्टेजवर जाऊ शकणार नाही याचे मला खूप वाईट वाटते. माझी टीम कॉन्सर्टच्या पुढच्या तारखेवर काम करत आहे. मला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. तुम्हा सर्वांना खूप प्रेम.” यानंतर शकीराचे चाहते तिच्या तब्येतीसाठी चिंता व्यक्त करत आहे.
दरम्यान, सोमवारपर्यंत डिस्चार्ज मिळण्याची आणि पुन्हा दौरा सुरू होण्याची आशा तिने व्यक्त केली. तसेच चाहते देखील तिला पुन्हा कॉन्सर्टमध्ये पाहण्यासाठी आतुर आहेत. शकीरा सध्या लास ‘मुजेरेस या नो लोन’ प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आपल्या गाण्यांनी तिने चाहत्यांना भुरळ घातली आहे. जगभरात तिचा मोठा चाहता वर्ग आहे. Shakira Hospitalized |
हेही वाचा :
अरे बाप रे ! घरात तब्बल 350 मांजरी; फ्लॅटचा दरवाजा उघडताच सगळेच चक्रावले