Malaika-Arjun : एक्स गर्लफ्रेंड मलायका अरोराच्या डान्सवर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया; म्हणाला मी वर्षानुवर्षे गप्प आहे आणि आताही…

Updated On:
Malaika-Arjun : एक्स गर्लफ्रेंड मलायका अरोराच्या डान्सवर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया; म्हणाला मी वर्षानुवर्षे गप्प आहे आणि आताही…

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा 2024 मध्ये वेगळे झाले. ते त्यांच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे बोलले नाहीत, पण दोघेही अनेकदा एकत्र दिसले. आता दोघेही पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. टीव्ही रिॲलिटी शो इंडियाज बेस्ट डान्सर vs सुपर डान्सरच्या सेटवर मलायका आणि अर्जुल एकत्र दिसले. अर्जुन कपूरने नुकतेच मलायका परीक्षक असलेल्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर’ या रिॲलिटी शोमध्ये हजेरी लावली होती.

‘मेरी हजबंड की बीवी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अर्जुन कपूर या शोच्यामध्ये दाखल झाला होता. या शोमध्ये अर्जुन कपूरने केलेले वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे. या रियालिटी शोमध्ये सूत्रसंचालक हर्ष याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अर्जुन कपूर म्हणाला, बऱ्याच वर्षांपासून मी अवाक आहे. मला आताही शांतच राहायला आवडेल, पण मला हे सांगायचे आहे की मला माझी आवडती गाणी ऐकण्याची संधी मिळाली.

या गाण्यांमधून तिच्या करिअर व आयुष्याविषयी जाणून घेता येते. अशा प्रकारची गाणी, परफॉर्मन्स आणि आताही ती व्यक्ती ज्या पद्धतीने तिचे काम करीत आहे, त्यासाठी तिचे आपण कौतुक करू शकतो, त्यासाठी मलायका तुझे अभिनंदन. तुला माहीतच आहे की मला ही गाणी किती आवडतात. अशा पद्धतीने तू हे सर्व साजरे करत आहेस, हे पाहून आनंद झाला, अशी प्रतिक्रिया अर्जुनने दिली.

त्याच्या या प्रतिक्रेयवर मलायकानेही धन्यवाद असा प्रतिसाद दिला. मलायका अरोरा, रेमो डिसूजा आणि गीता या शोमध्ये जज आहेत. सर्वांनी मलाइकाला स्टेजवर बोलावून त्यांच्या गाण्यांवर डान्स करण्यास सांगितले. या दरम्यान भूमी आणि अर्जुन मलायकासाठी चिअर करताना दिसले. अर्जुन कपूरही आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मलायका अरोराच्या रिॲलिटी शोमध्ये पोहोचला होता.

2018 मध्ये मलायका आणि अर्जुन यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. अर्जुन त्याच्या आगामी मेरे पति की बीवी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये पोहोचला होता. मेरे पति की बीवी हा चित्रपट 21 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज यांनी केले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Sonu Sood : नेपाळमध्ये जलप्रलय, हजारो नागरिक संकटात; मदतीला धावून आला 'सोनू सूद', मनीषा कोईरालाही भावुक !

2026-08-27 18:50:09

Sonu Sood : नेपाळमध्ये जलप्रलय, हजारो नागरिक संकटात; मदतीला धावून आला 'सोनू सूद', मनीषा कोईरालाही भावुक !

Malaika Arora : 52 व्या वर्षी मलायका अरोरा करणार दुसरं लग्न? नवीन बॉयफ्रेंडसोबतचा 'तो' व्हिडिओ झाला व्हायरल, चर्चांना उधाण.!

2026-08-27 18:04:52

Malaika Arora : 52 व्या वर्षी मलायका अरोरा करणार दुसरं लग्न? नवीन बॉयफ्रेंडसोबतचा 'तो' व्हिडिओ झाला व्हायरल, चर्चांना उधाण.!

Asha Singh Jaiswal : मनोरंजन विश्वावर शोककळा ! 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन; महाभारत मालिकेत साकारली होती खास भूमिका

2026-08-23 18:37:21

Asha Singh Jaiswal : मनोरंजन विश्वावर शोककळा ! 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन; महाभारत मालिकेत साकारली होती खास भूमिका

Actress Hospitalised : 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

2026-08-22 15:58:17

Actress Hospitalised : 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

Bollywood Actress Death : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचे वयाच्या २७ व्या वर्षी निधन; कुटुंबीयांनी महिनाभरानंतर दिली माहिती

2026-08-16 18:06:32

Bollywood Actress Death : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचे वयाच्या २७ व्या वर्षी निधन; कुटुंबीयांनी महिनाभरानंतर दिली माहिती