मनातून कधीच हरायचे नाही – अभिनेत्री मीरा जगन्नाथ

मांजरी(प्रतिनिधी) : आपण आपले काम नेहमी आत्मविश्वासाने करावे. आयुष्यात कोणतीही वेळ आली तरी डगमगायचे नाही. आपली दहा कामे होणार नाहीत. मात्र , अकरावे काम चांगलेच होईल हा विश्वास ठेवून प्रयत्न करत पुढे जात राहिले पाहिजे. काहीही झाले तरी मनातून कधीच हरायचे नाही. गावातून आलेली, कुटुंबात अभिनय याची पार्श्वभूमी नसताना हे काम आव्हानात्मक जरूर आहे; पण ते मला मनःपूर्वक आवडते. बिग बॉसच्या या पर्वात मला जनतेने दिलेल्या सपोर्ट मुळे एक स्ट्रॉग मुलगी म्हणून मला प्रेक्षकांनी स्वीकारले आहे . हे मोठे समाधान वाटते, अशी भावना अभिनेत्री मीरा जगन्नाथ रुपनर हिने व्यक्त केली.
बिग बॉस मराठी 3 मध्ये सहभाग घेऊन तिसऱ्या राउंड पर्यंत टिकून राहिलेल्या अभिनेत्री मीरा जगन्नाथ रुपनर हिचा सत्कार मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमित घुले यांनी केला. त्यावेळी अभिनेत्री मीराने आपल्या आजवरच्या प्रवासाचे श्रेय आपले आई- वडील आणि जनतेला दिले.
मीरा जगन्नाथ सांगते, कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नसताना एका गावाकडच्या मुलीने इथपर्यंत प्रवास करणे अवघड होते, मात्र आज केवळ जनतेच्या सपोर्टमुळे मी आईवडील यांची एक स्ट्रॉग मुलगी तर झालेच शिवाय समाजातील महिलांनी आणि माझ्या वयाच्या मुलींनीही मला स्ट्रॉग
मुलगी म्हणून स्वीकारले याचे समाधान वाटते.
दरम्यान, मांजरी बुद्रुक गावची सुकन्या म्हणून आम्ही अभिनेत्री मीरा हिचा सत्कार केला असून त्यामुळे तिच्या सारख्या असा अनेक कलाकार यांना यातून स्फूर्ती मिळेल असे अमित घुले यांनी सांगितले. यावेळी जगन्नाथ रुपनर, तुषार घुले, रफिक शेख, मयूर मिरगणे, करण प्रभुणे, शरणांप्पा हानुरे, हर्षल पवार, दिपक पवार आदी. उपस्थित होते.





