बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री करणार ‘ही’ बोल्ड अभिनेत्री

अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार असलेला बिग बॉस मराठी हा कार्यक्रम आता अवघ्या काही तासांमध्ये सुरु होणार आहे. पाचव्या सिझनविषयी प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. या घरात कोणत्या स्पर्धकांची होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. त्यातच आता बिग बॉसच्या घरात दाखल होणाऱ्या स्पर्धकांचे नॉन रिव्हिलिंग प्रोमो शेअर करण्यात येत आहेत.
नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक डान्सिंग क्विन बिग बॉसच्या घरात सहभागी होणार आहे. या प्रोमोवरुन ही डान्सिंग क्विन निक्की तांबोळी असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. नेटकऱ्यांनी त्या प्रोमोमध्ये निक्कीला टॅग केलं आहे. त्यामुळे निक्की खरंच बिग बॉसच्या घरात सहभागी होणार का? हे येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल.
कोण आहे निक्की तांबोळी?
निक्की तांबळी ही हिंदी बिग बॉसच्या 14 व्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे निक्की चांगलीच प्रकाशझोतात देखील आली. त्यानंतर तिला अनेक सेलिब्रेटींच्या म्युझिक अल्बममध्येही दिसली होती. तसेच ती कंचना-3 या सिनेमात देखील झळकली होती. तिने आतापर्यंत अनेक तेलुगु सिनेमांमध्ये काम केले आहे.




