हिना खानने मानले सलमान खानचे आभार; म्हणाली “थकलेला असतानाही त्याने माझ्या तब्येतीबाबत…”

Salman Khan | अभिनेत्री हिना खान धैर्याने कॅन्सरशी लढा देत आहे. या प्रवासात तिला अनेकजण आधार देत आहेत. नुकतेच हिनाने बिग बॉस हिंदी सीजन 18 च्या ‘वीकेंड का वॉर’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने सलमान खान आणि घरातील सदस्यांची भेट घेतली. याबद्दल तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
हिना खानने ‘बिग बॉस 18′ च्या मंचावरून सलमान खानसोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत हिनाने सलमान खानसाठी एक लांबलचक पोस्ट लिहून सलमानचे आभार मानले आहेत. “कायम नम्र आणि दयाळू असलेल्या सलमान खानला जेव्हा कधी मी भेटते तेव्हा त्याच्याकडून कोणती ना कोणती गोष्ट शिकायला मिळते. अर्थात ही वेळ वेगळी होती. पूर्ण दिवस उभं राहून, शूटिंग पूर्ण करून तो इतका थकलेला असतानाही तो मला भेटला. त्याने मला बोलावलं. तो माझ्याबरोबर बसला आणि जवळपास तासभर बोलला. त्याने माझ्या उपचाराविषयीचे प्रत्येक तपशील जाणून घेतले. माझा आत्मविश्वास वाढवण्याचा त्याने ज्या प्रकारे प्रयत्न केला तो इतर कोणत्याही गोष्टीसारखा नव्हता.’
View this post on Instagram
पुढे तिनेम्हंटले, “त्याने केवळ त्याचा अनुभव आणि ज्ञान शेअर केले नाही तर मला पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वास असणारी व्यक्ती बनण्यास सांगितले. त्याने मला धीर दिला. खरंतर त्याला हे काहीही करण्याची गरज नव्हती. पण त्याने ते केलं. तो कोण आहे? तो किती व्यस्त आहे? तो किती कामात आहे, तरीही त्याने वैयक्तिकरित्या मला खूप आधार दिला. हा माझ्यासाठी फक्त मनापासून आधार नाही. तो एक धडाही आहे आणि मी तो कधीच विसरणार नाही. तू जसा आहेस तसा राहण्यासाठी थँक्यू सलमान, तुझी मी खूप आभारी असेन कायमच.” अशी पोस्ट तिने लिहिली. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत सलमानचं आणि तिचं कौतुक केलं.





